नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील सहभागावरुन वाद ओढवून घेणारा आणि सलग दोन आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणार एकमेव खेळाडू मल्ल सुशील कुमारची अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शनिवारी छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या निवडणूकीत सुशीलची बिनविरोध निवड झाली. याआधी महाबली सतपाल यांनी अध्यक्ष म्हणून १२ वर्ष कामकाज पाहिल्यानंतर त्यांच्या जागी सुशीलची वर्णी लागली आहे. त्याचवेळी पद्मभूषण पुरस्कार विजेते सतपाल यांना यावेळी महासंघाच्या मुख्य संरक्षक म्हणून निवड झाली. दिल्ली सरकारमध्ये विशेष क्रीडा अधिकारी म्हणून सुशीलची कारकिर्द २०२० सालापर्यंत राहिल. प्रत्यक्ष निवडणूकीदरम्यान सुशील स्वत: उपस्थित होता. यावेळी महासंघाच्या ४१ संस्थांपैकी ३९ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वानुमते सुशीलची अध्यक्षपदी निवड केली. (वृत्तसंस्था)
सुशीलची शालेय महासंघाच्या अध्यक्षपदी निवड
By admin | Published: June 26, 2016 1:56 AM