मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीतर्फे आयोजित कॅरम स्पध्रेत पुरुष गटात मुंबईच्या स्वप्निल गोलतकर व महिला गटात स्नेहल कलझुनकर यांनी जेतेपद पटकावले. या स्पध्रेत एकूण 84 पुरुष व 16 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वप्निलने दुस:या मानांकित अलंकार नाईकचा 25-14, 25-14 असा, तर स्नेहलने अग्रमानांकित विमल मोहितेचा 25-7, 25-15 असा पराभव केला. विजेत्यांना प्रमाणपत्र
आणि चषक देऊन गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)