ऑनलाइन लोकमत -
रिओ दी जानेरो, दि. 10 - ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. मायकल फेल्प्सने रिओतील जलतरण स्पर्धेत कारकिर्दीतील 21वं पदक सुवर्णपदक जिंकलं आहे. ४x२०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात मायकल फेल्प्सचा सहभाग असेल्लाय अमेरिकेला सांघिक सुवर्णपदक मिळाले आहे. एकाच दिवशी मायकल फेल्प्सने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याअगोदर झालेल्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक मिळवत अगोदरर त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
फेल्प्सचे ऑलिम्पिकमधील हे 21 वे सुवर्णपदक ठरले. त्याने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 25 पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत १९ गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. फेल्प्सला सोमवारी झालेल्या ४x१०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळाले होते. 21 सुवर्णपदकांसह 25 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.
आपल्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ३१ वर्षीय फेल्प्स याने अमेरिका संघाला रेयान हेल्ड, सीलेब ड्रेसल यांच्या साथीने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रिले टीमला गोल्ड मिळवून दिले होते. या खेळाडूंनी ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदकावर ताबा मिळविला होता.