ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ४ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट-इंडिजसोबतचा उपांत्या सामना हरल्यामुळे भारताला धक्का बसला. त्यानंतरर अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला नमवत टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदावर नाव कोरले. भारत अंतिम फेरीत न पोचल्याने चाहत्यांची जरी निराशा झाली असली भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 'मालिकावीरा'चा पुरस्कार पटकावल्याने चाहते खुश आहेत.
टी-२० वर्ल्डकपमधील पहिला सामना गमावल्यानंतर इतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटने मोलाचा वाटा बजावला. त्याने ५ सामन्यांत १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या असून त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने झुंजार खेळी करून भारताला पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला होता.वेस्टि इंडिजविरुद्ध केलेली ८९ धावांची खेळी ही त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी होती. त्याेन न्युझीलँडविरुद्ध २३ धावा, पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावा, बांग्लाेशविरुद्ध २४ धावा तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावा फटकावल्या.
दरम्यान पुरस्कार सोहळ्याला विराट उपस्थित नसल्याने त्याच्यावतीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हा पुरस्कार स्वीकारला.
' भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून टी-२- विश्वचषकावर नाव कोरता न आल्याने मी निराश झालो असलो तरीही मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान आहे' अशी प्रतिक्रिया विराटने व्यक्त केली.
Congratulations to Virat Kohli - he's been chosen as the player of #WT20 ! https://t.co/ibO6C8XnAtpic.twitter.com/y183JuJN0v— ICC (@ICC) April 3, 2016