ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. ३० ऑस्ट्रेलियन महिलांच्या शिस्तबध्द गोलंदाजीच्या बळावर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत इंग्लडला ५ धावांनी धूळ चारत ऑस्ट्रेलियन महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लडला निर्णायक सलामी मिळाली असतानाही ठराविक अंतरावर फलंदाज गमवल्यामुळे १३३ धानांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्घारित २० षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
टी २० विश्वचषकाचा ३ वेळचा विजेता असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी आपल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या इंग्लाडला ५ धावांनी हरवले, एकवेळ इंग्लड १ गड्याच्या मोबदल्यात ८९ धावा अश्या सुस्थित होता. हा सामना ते सहज खिशात घालतील असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियन गोंलदाजांनी मध्या षटकात निर्णायक गोलंदाजी करत इंग्लडला विजयापासून ५ धावा आधिच रोखले. आणि टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी सामना हिसकावून आणला, त्यांनी २८ धावात६ फलंदाजांना बाद करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि सामना जिंकला
इंग्लंडची कर्णधार चार्लोट एडवर्डस्ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करताना एलेसा हिली २५, एलिसे विलानी १९, मेग लेंनिग ५५, एलिसे पैरी १०, एलेक्स ब्लैकवेल ११, जेस जोनासन ०४, बेथ मूनी नाबाद ०१ आणि अतिरिक्त ७ धावांच्या बळावर इंग्लड विरुद्ध निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा करत इंग्लडपुढे १३३ धानांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजींनी ४१ धावांची चांगली सलामी दिली असताना ठराविक अंतरावर फलंदाज गमवल्यामुळे मोठ्या धावसंखेपासून दुर राहिले. इंग्लडकडून गोलंदाजी करताना नताली शिवरने आपल्या ३ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाज बाद केले. लॉरा मार्श आणि जैनी गुन यांनी प्रत्येकी एका गड्याला तंबूचा रस्ता दाखवला.