नागपूर : आयसीसी टी-२० विश्वकप ट्रॉफी शनिवारी नागपुरात पोहोचली. या वेळी वेगवान गोलंदाज उमेश यादव सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यादवने चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ २० मुलांसोबत चर्चा केली. त्यांना स्वच्छतादूत बनविण्यात आले आहे. या वेळी आयसीसीने युनिसेफ व बीसीसीआयच्या संयुक्त विद्यमाने ‘टीम स्वच्छ क्लिनिक’ लाँच केले. यादवने या वेळी स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. नागपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १५ मार्च रोजी पहिली लढत खेळली जाणार आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
टी-२० विश्वकप ट्रॉफी नागपुरात
By admin | Published: February 28, 2016 1:08 AM