पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या ५०व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ८५ किलो गटात सातारच्या तानाजी बिरकरने उत्तर प्रदेशच्या बिपीनला आसमान दाखविले. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने बाबूराव सणस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ८५ किलो गटात लढतीत सातारच्या मल्लांनी आपला दबदबा कायम ठेवला. महाराष्ट्राकडून खेळताना साताऱ्याच्या तानाजी वीरकरने दुहेरी पट काढून खाली घेत उत्तर प्रदेश ब संघाच्या बिपीनला आस्मान दाखविले. महाराष्ट्र अ संघाकडून आखाड्यात उतरलेला साताऱ्याचाच संजय सुळने दिल्ली ब संघाच्या अरविंदचा १४-३ गुणांनी पराभव करून आगेवूष्ठच केली.कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने ७५ किलो वजनी गटामध्ये जम्मू काश्मीरच्या बलवंत सिंगचा १०-० गुणांनी धुव्वा उडविला. पंजाब ब संघाच्या सुनीतने केरळच्या संजयचा १२-० ने धुळ चारली. दिल्ली अ संघाच्या नवीनने गुजरातच्या विक्रमचा पराभव केला.उत्तराखंडच्या मनोज कुमारने महाराष्ट्र अ संघातील पुणे जिल्ह्याच्या रविंद्र करेचा ७-० असा पराभव करित आगेकूच केली. १०० किलो वजनी गटात रेल्वे अ संघाच्या नरेशने केरळच्या अरफानला चितपट मध्ये असलेला केले. हरियाणा अ संघाच्या विकीने सीआयएसएफ संघाचा अमित कुमार याचा ५-४ असा पराभव करित आगेकूच केली. तेलंगणाचा ए. सारवान व राजस्थानच्या आदित्य यांना त्यांचाच प्रतिस्पर्धी उपस्थित न राहिल्यामुळे पुढे चाल देण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)
तानाजीने दाखविले बिपीनला आसमान
By admin | Published: April 30, 2017 1:56 AM