ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 18 - श्रेयस अय्यर (60) व ड्युमिनीच्या (54) शानदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने हैदराबादसमोर जिंकण्यासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीने 20 षटकांत 4 गडी गमावून 167 धावा केल्या. दिल्लीचा स्टार फलंदाज युवराज सिंग अवघ्या 9 धावांवर बाद झाला तर अगरवाल अवघी 1 धाव काढून तंबूत परतला. हैदराबादतर्फे एस. कुमार, स्टेन, बी. कुमार आणि आशिष रेड्डी यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
आयपीएलच्या या पर्वात दिल्ली व हैदराबादने आत्तापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले असून त्या दोघांनाही फक्त 1-1 विजय मिळवता आला आहे. मात्र असे असले तरी दिल्लीचा संघ गुणांच्या बाबतीत हैदराबादच्या पुढे आहे.