शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

टेलरचे विक्रमी शतक

By admin | Published: February 23, 2017 1:12 AM

रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन डेत द. आफ्रिकेचा सहा

ख्राईस्टचर्च : रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन डेत द. आफ्रिकेचा सहा धावांनी पराभव करीत दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली.टेलरच्या ११० चेंडूंतील आठ चौकारांसह काढलेल्या नाबाद १०२ धावांमुळे न्यूझीलंडने ४ बाद २८९ धावा उभारल्या. द. आफ्रिका संघ ड्वेन प्रिटोरियसच्या झटपट अर्धशतकामुळे (२६ चेंडंूत ५० धावा) विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचला. पण, ९ बाद २८३ धावा करूनदेखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. द. आफ्रिकेचा सलग १२ विजयांचा क्रम खंडित झाला. द. आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने ५७ आणि एबी डिव्हिलियर्सने ४५ धावा केल्या. या संघाने २१४ धावांत आठ फलंदाज गमविल्यानंतर विजयाची आशा सोडून दिली होती. (वृत्तसंस्था)पण, यजमान संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा आणि कमकुवत माऱ्याचा त्यांना लाभ झाला. ट्रेन्ट बोल्टने ४९ व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर प्रिटोरियसची दांडी गूल केली. आफ्रिकेला विजयासाठी सहा चेंडूत १५ धावा हव्या होत्या. तथापि, त्यांना सहा धावा कमी पडल्या. बोल्टने ६३ धावांत तीन आणि मिशेल सेंटनरने ४६ धावांत दोन गडी बाद केले. टेलरने डावातील अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून १७ वे शतक गाठले. यादरम्यान त्याने सहकारी नॅथन अ‍ॅस्टलचा देशाकडून सर्वाधिक १६ शतकांचा विक्रम मोडला.या खेळीदरम्यान ६००० धावांचा पल्ला गाठणारा टेलर न्यूझीलंडचा चौथा फलंदाज बनला. कर्णधार केन विलियम्सनसोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी १०४, अष्टपैलू जिमी नीशाम(नाबाद ७१)सोबत पाचव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी केली.