शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

टीम इंडियाची नजर पुन्हा ‘क्लीन स्वीप’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 12:14 AM

वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत

हरारे : वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देऊन करण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत धोनी अँड कंपनीने ३-० ने विजय मिळविला. आता त्यांचे लक्ष्य टी-२० मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे. केदार जाधव व मनीष पांडे यांच्यासारख्या खेळाडूंना २०१५ मध्ये येथे टी-२० मालिका खेळण्याचा अनुभव आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला त्यावेळी दुसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत संपली होती. जगातील सर्वांत अनुभवी टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी क्लीन स्वीप देण्याचा प्रबळ दावेदार आहे. या १५ सदस्यांच्या संघात फैज फझलचा अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएल खेळतात. उभय संघांच्या कामगिरीची तुलना करता धोनीला फलंदाजीमध्ये बदल करण्याची संधी आहे. मनदीप सिंग, जयंत यादव, जयदेव उनाडकट यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. धोनी संघाच्या संयोजनासह सलामी लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे संघात अधिक बदल करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता कमी आहे. धोनीने फलंदाजीमध्ये स्वत:ला बढती द्यायला हवी. कारण, त्याला खेळताना बघण्याची इच्छा बाळगणाऱ्या येथील मोजक्या भारतीय चाहत्यांची वन-डे मालिकेत निराशा झाली. कारण, त्यावेळी कर्णधाराला फलंदाजी करण्याची गरजच भासली नाही. के.एल. राहुल, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि धोनी टी-२० मालिकेत खेळणार असल्याचे निश्चित आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी करुण नायर आणि फझल यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येईल. नायरने दोन वन-डेमध्ये डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या लढतीत त्याने ३९ धावांची खेळी केली. फझलने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. नायरची टी-२० सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याने निलंबित राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांचे प्रतिनिधित्व करताना ६४ सामन्यांत १२२ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता १०५ चा स्ट्राइक रेट असलेल्या फझलला २०११ नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. पंजाबच्या मनदीपला राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केदार जाधवही शर्यतीत आहे. त्याला एकही वन-डे खेळण्याची संधी मिळाली नाही. (वृत्तसंस्था)टीम इंडियाची नजर पुन्हा ‘क्लीन स्वीप’वरहरारे : वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देऊन करण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत धोनी अँड कंपनीने ३-० ने विजय मिळविला. आता त्यांचे लक्ष्य टी-२० मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे. केदार जाधव व मनीष पांडे यांच्यासारख्या खेळाडूंना २०१५ मध्ये येथे टी-२० मालिका खेळण्याचा अनुभव आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला त्यावेळी दुसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत संपली होती. जगातील सर्वांत अनुभवी टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी क्लीन स्वीप देण्याचा प्रबळ दावेदार आहे. या १५ सदस्यांच्या संघात फैज फझलचा अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएल खेळतात. उभय संघांच्या कामगिरीची तुलना करता धोनीला फलंदाजीमध्ये बदल करण्याची संधी आहे. मनदीप सिंग, जयंत यादव, जयदेव उनाडकट यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. धोनी संघाच्या संयोजनासह सलामी लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे संघात अधिक बदल करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता कमी आहे. धोनीने फलंदाजीमध्ये स्वत:ला बढती द्यायला हवी. कारण, त्याला खेळताना बघण्याची इच्छा बाळगणाऱ्या येथील मोजक्या भारतीय चाहत्यांची वन-डे मालिकेत निराशा झाली. कारण, त्यावेळी कर्णधाराला फलंदाजी करण्याची गरजच भासली नाही. के.एल. राहुल, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि धोनी टी-२० मालिकेत खेळणार असल्याचे निश्चित आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी करुण नायर आणि फझल यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येईल. नायरने दोन वन-डेमध्ये डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या लढतीत त्याने ३९ धावांची खेळी केली. फझलने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. नायरची टी-२० सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याने निलंबित राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांचे प्रतिनिधित्व करताना ६४ सामन्यांत १२२ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता १०५ चा स्ट्राइक रेट असलेल्या फझलला २०११ नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. पंजाबच्या मनदीपला राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केदार जाधवही शर्यतीत आहे. त्याला एकही वन-डे खेळण्याची संधी मिळाली नाही. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), केएल राहुल, फैज फजल, करुण नायर, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, मनदीप सिंग, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, धवल कुलकर्णी, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, जयंत यादव. झिम्बाब्वे :- ग्रीम क्रेमर (कर्णधार), वुसी सिबांडा, सिकंदर रजा, एल्टन चिगुंबुरा, हॅमिल्टन मसाकाजा, वेलिंग्टन मसाकाजा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो, माल्कम वॉलर, पीटर मूर, तपिवा मुफुजा, तिनोतेंदा मुतोम्बोदजी, रिचमंड मुतुम्बामी, तोराइ मुजाराबानी, ब्रायन चारी, नेविले मेजिवा, तिमीकेन मारुमा.सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० पासून.