- जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने अनपेक्षितपणे मजल मारली असली, तरी रविवारी रंगणाऱ्याअंतिम लढतीत भारतच बाजीमारेल, असा अंदाज सट्टेबाजारातूनही व्यक्त केला जात, जवळपास १० हजार कोटींचा सट्टा लावला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यात टीम इंडिया ‘फेव्हरेट’असून, त्यांच्यासाठी एका रुपायाला ८० पैसे, तर पाकसाठी १ रुपयासाठी ३.४० पैसे इतका दर देण्यात आला आहे. नाणेफेकीसाठी उभय संघांबाबत अनुक्रमे पावणे दोन व २.४० रुपये इतका दर लावण्यात आला आहे. संघाबरोबरच दोन्ही टीममधील खेळाडूंवरही सट्टा लावण्यात आला आहे. .एक रुपयामागे दर..खेळाडू सर्वाधिक धावाविराट कोहली१.४० रोहित शर्मा १.२०अझर अली३.२०शोयब मलिक३.९३बुमराह२.००आर. आश्विन१.२०हसन अली१.१०शादाब१.७०
सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरेट
By admin | Published: June 18, 2017 1:42 AM