नागपूर : जामठा स्टेडियममध्ये मंगळवारी भारत-न्यूझीलंड लढतीद्वारे आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची खरी रंगत रंगणार आहे. उभय संघ रविवारी नागपुरात डेरेदाखल झाले. माजी विजेत्या भारताकडून विश्वकप स्पर्धेच्या मुख्य फेरीतील सलामी लढतीत चमकदार कामगिरीची आशा आहे. आयसीसीने खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असावी, अशी सूचना व्हीसीएला दिली आहे. त्यामुळे भारत- न्यूझीलंड लढतीत जामठा स्टेडियममध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान खात्याने वातावरण चांगले राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लढतीसाठी जामठा स्टेडियम हाऊसफुल राहणार असल्याचे निश्चित आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सहा क्वालिफायर सामने नागपुरात खेळले गेले. अफगाणिस्तानने त्यात सरशी साधताना मुख्य फेरीत धडक मारली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
टीम इंडिया नागपुरात दाखल
By admin | Published: March 14, 2016 12:55 AM