शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

टीम इंडियाच लय भारी

By admin | Published: February 16, 2015 1:55 AM

विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या

अ‍ॅडिलेड : विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव करीत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. आजपर्यंत जे घडले नाही ते यावेळी घडणार, अशी आस ठेवून असणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी या निकालामुळे पुन्हा एकदा निराशा पडली. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजयाचा षट्कार ठोकला. १९९२ मध्ये आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेपासून पाकिस्तानविरुद्ध प्रारंभ झालेली विजयाची मालिका यावेळीही भारताने कायम राखली. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने १२६ चेंडूंना सामोरे जाताना १०७ धावांची खेळी केली. शतकवीर कोहली व्यतिरिक्त सुरेश रैना (७४) आणि शिखर धवन (७३) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ७ बाद ३०० धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानचा डाव ४७ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे मोहम्मद शमी (३५ धावांत ४ बळी), मोहित शर्मा (३५ धावांत २ बळी) आणि उमेश यादव (५० धावांत २ बळी) यांनी अचूक मारा करीत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे मिसबाह उल-हकने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्या षटकांत अनुभवी युनूस खान (६) याला मोहम्मद शमीने तंबूचा मार्ग दाखविला. शहजाद व हॅरिस सोहेल (३६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरिस सुरुवातीपासून फॉर्मात असल्याचे दिसून येत होते; पण शहजाद मात्र संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. हॅरिसने यादवच्या एका षटकात तीन चौकार वसूल करीत आपला निर्धार स्पष्ट केला; पण फिरकीपटू अश्विनने हॅरिसचा अडथळा दूर करीत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. पाकिस्तानने २३ व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण केले. त्यानंतर धोनीने यादवला पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण केले. यादवने दुसऱ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात शहजाद व शोएब मकसूद (०) यांना तीन चेंडूंच्या अंतरात माघारी परतवीत भारताला वर्चस्व मिळवून दिले. शहजादने यादवच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जडेजाला झेल दिला, तर मकसूदचा झेल स्लिपमध्ये तैनात रैनाने टिपला. जडेजाने त्यानंतरच्या षटकात उमर अकमलला (०) धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तानची ५ बाद १०३ अशी अवस्था झाली. अकमलला मैदानावरील पंच रिचर्ड कॅटलब्रा यांनी नाबाद ठरविले होते; पण धोनीने रेफरलची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांचा कौल भारतीय संघाच्या बाजूने मिळाला. पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. शमीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडालेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात ह्यपॉवर प्लेह्ण घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकांत पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावीत ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या (१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी १०७ धावांची गरज होती. शमीने त्यानंतर मिसबाहला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडत पाकला नववा धक्का दिला. मिसबाहने ८४ चेंडूंत नऊ चौकार व एक षट्कार ठोकला. मोहितने सोहेल खानला बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघातर्फे कोहलीने आपल्या आवडीच्या अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर शतक झळकावीत सूर गवसल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानतर्फे युवा वेगवान गोलंदाज सोहेलने (५५ धावांत ५ बळी) डेथ ओव्हरमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा फटकाविता आल्या. कोहलीने २२ वे शतक झळकाविताना सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)

 

> हा माझ्या करिअरमधील स्पेशल दिवसांपैकी एक आहे. पाकिस्तानसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवून विश्वचषकात ‘विनिंग स्टार्ट’ करणे अविस्मरणीय आहे. आमच्याप्रमाणेच पाकसाठीही ही लढत महत्वाची होती. या संघाने चांगली झुंज दिली. मागील काही सामन्यांतील कामगिरी बघता एक-दोन दिवसांपासून मी थोडा नर्व्हस होतो. विपरित परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडून आम्ही विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ जोरात केला, याचे विशेष समाधान आहे. दुसºया बाजूने फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे जावे यासाठी एक बाजू लावून धरणे, माझ्याकडून अपेक्षित होते. यात मी यशस्वी ठरलो. शिखर आणि रैना यांनी मोलाची साथ दिल्यामुळेच आम्ही तीनशेची मजल मारू शकलो. हे विजयी अभियान संपूर्ण स्पर्धेत कायम राहील, अशी अपेक्षा आहे. - विराट कोहली, सामनावीर

 

> कॅ प्टन खुश हुआ ! या संस्मरणीय विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते. पाकविरुद्धचा हा मोठा विजय म्हणजे ‘परफेक्ट टीम वर्क’चे उत्तम उदाहरण आहे. फलंदाजांच्या कामगिरीबाबत मी विशेष आनंदी आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे नसते. सामन्याच्या प्रारंभी चेंडू नीट बॅटवर येत नव्हता. शिवाय चेंडूचा टप्पा पडल्यावर वेगाचा अंदाज येत नव्हता. या परिस्थितीचा फलंदाजांनी संयमाने सामना केला. नंतर विराट, शिखर, रैना यांनी आपला रंग दाखवला. या तिघांच्या फलंदाजीचे विजयात खचितच मोलाचे योगदान आहे. अशा मोठ्या सामन्यात मी भावनांवर नियंत्रण ठेवत नाही. माझ्या चेहºयांवररून ते ओळखू येत नाही इतकेच. खास या सामन्यासाठी भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर चाहते येथे आले. येथे येऊन आमचे मनोबल वाढवल्याबद्दल थँक्स! - महेंद्रसिंह धोनी, कर्णधार, भारत

 

> भारत चांगला खेळला या सामन्यात आम्हालाही विजयाची संधी होती. मात्र, शतकी वेस ओलांडल्यावर ३ महत्वाचे फलंदाज झटपट गमावल्याची किंमत आम्हाला पराभवाच्या रुपात मोजावी लागली. टीम इंडियाने सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस खेळ केला, हे मान्य करावेच लागेल. अवघड खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली आणि प्रभावी गोलंदाजी करून आम्हाला रोखले. आघाडीचे आणि मध्यफळीतील फलंदाज चांगले खेळले असते तर विजय मिळवता आला असता. मात्र, दोघा-तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. ही लढत गमावली असली तरी, उर्वरित सामन्यांत आम्ही कामगिरी उंचावू. पुढील सामन्यात कमबॅक करण्यावर आता आम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. - मिसबाह-उल-हक, कर्णधार, पाकिस्तान