ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेटने धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. 15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण हा सामना न खेळता टीम इंडिया फायनलला जाण्याची शक्यता आहे. होय.. तुम्ही वाचलत ते खर आहे...कारण हवामान विभागाने बर्मिंगहॅममध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर या सामन्यात पावसानं आपला खेळ सुरु केला आणि जर टीम इंडिया बांगलादेशचा सामना झालाच नाही तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं. आयसीसीने सेमीफायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी मात्र, रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे.
आणखी वाचा : चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!
आतापर्यंत बर्मिंगहममध्ये खेळविण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यात पावसाने व्यत्य आणलेला आहे. इथंच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बराच अडथळा आणला होता. जर या सामन्यातही पावसानं हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणांच्या आधारावर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.
आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!
चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटात भारत अव्वल स्थानावर आहे. भारताने पाकिस्तान आणि आफ्रिकेचा पराभव करत चार गुण मिळवत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अ गटात असलेल्या बांगलादेशचा एका सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बांगलादेशच्या नावावर तीन गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. बर्मिंगहॅम पावसाने खेळ सुरु केला तर भारताचा फायनलमध्ये प्रवेश पक्का आहे.
आणखी वाचा : "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन यावर्षी इंग्लंडमध्ये होत आहे. बऱ्याचशा सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही सामने रद्द करावे लागले तर काही सामने कमी षटकांचे खेळवण्यात आले. पावसाच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.
सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद
जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली
सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर