मुंबई : आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडू येथे दाखल झाले; नंतर सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले. बीसीसीआयने ही माहिती दिली. धोनी आॅस्ट्रेलियातून दिल्लीत दाखल झाला; तर कोहली आपली मैत्रीण अनुष्का शर्मा हिच्यासोबत मुंबईला पोहोचला. या दोघांसोबत रवी शास्त्री; तसेच अन्य पाच खेळाडूंचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. २६ मार्च रोजी सेमी फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे आॅस्ट्रेलियातून मुंबईला परतले. संघातील अन्य खेळाडूंचे शनिवारच्या रात्री भारतात आगमन होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरीत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या महेंद्रसिंह धोनी, संघ संचालक रवी शास्त्री, विराट कोहली अनुष्का शर्मासह, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांचे मुंबई येथील शिवछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्या वेळचे छायाचित्र.
चार महिन्यांनंतर टीम इंडिया मायदेशी परतली...
By admin | Published: March 28, 2015 11:21 PM