नवी दिल्ली : टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आगामी ६ जुलै रोजी रवाना होणार आहे. हा दौरा ४९ दिवसांचा असेल. बीसीसीआयने गुरुवारी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. जुलै-आॅगस्ट या कालावधीत होणाऱ्या ४९ दिवसांच्या या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांआधी दोन सराव सामनेदेखील खेळवले जातील. २२ आॅगस्ट रोजी दौऱ्याची सांगता होईल. भारताचा दोन दिवसांचा पहिला सराव सामना वॉर्नर पार्क येथे १० जुलै रोजी होईल. त्यानंतर १४ ते १६ जुलै या कालावधीत तीन दिवसांचा सराव सामना होईल. पहिली कसोटी २१ ते २५ जुलै या कालावधीत अँटिग्वा येथील सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये, दुसरी कसोटी ३० जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत सबिना पार्क येथे, तिसरी कसोटी ९ ते १३ आॅगस्ट या कालावधीत सेंट लुसिया येथे आणि चौथी कसोटी १८ ते २२ आॅगस्ट या कालावधीत त्रिनिदादच्या क्वीन्स पार्कमध्ये खेळली जाईल. भारतीय संघ २३ आॅगस्ट रोजी मायदेशी परतणार आहे. (वृत्तसंस्था)
टीम इंडियाचा जुलैमध्ये विंडीज दौरा
By admin | Published: June 03, 2016 2:29 AM