शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

टीम इंडिया जोमात, झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खिशात

By admin | Published: July 12, 2015 4:32 PM

कर्णधार अजिंक्य रहाणे व मुरली विजयच्या दमदार सुरुवातीनंतरही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना भारताला २७१ धावांवर रोखण्यात यश आले.

ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. १२  - मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दिमाखदार विजय मिळवला आहे. दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ६२ धावांनी पराभव करत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

झिम्बाब्वे विरुद्ध भारतामधील दुस-या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतातर्फे अजिंक्य रहाणे व मुरली विजय ही जोडी सलामीला उतरली. या जोडीने भारताला शतकी सलामी करुन दिली. भारताच्या ११२ धावा झाल्या असताना अजिंक्य रहाणे ६३ धावांवर बाद झाला. मुरली विजय ७२ धावांवर बाद  झाला त्यावेळी भारताच्या २ बाद १५९ धावा झाल्या होत्या. अंबाटी रायडू व मनिष तिवारी या जोडीने ४४ धावांची भागीदार रचत भारताला २०० चा टप्पा गाठून दिला. त्यानंतर  रॉबिन उथप्पा १३, स्टुअर्ट बिन्नी २५ व केदार जाधव १६ धावांर बाद झाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटच्या १० षटकांत भारताला फक्त ७२ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेचा गोलंदाज नेव्हिले मेजिवाने सर्वाधिक चार विकेट घेत भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. 

पहिल्या वन डेत भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणारे झिम्बाब्वेचे फलंदाज आजच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. सलामीची जोडी अवघ्या २३ धावांवर फुटली. झिम्बाब्वेचे तीन फलंदाज अवघ्या ४३ धावांमध्येच तंबूत परतले. सलामीवीर चामू चिभाभाचा (७२ धावा) अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज भारतासमोर तग धरु शकला नाही. झिम्बाब्वेचा डाव ४९ षटकांत २०९ धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर हरभजन सिंगने १० षटकात २९ धावा देत एक विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-याने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना लगाम लावला.