ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - अजिंक्य राहाणे (52) आणि चेतेश्वर पूजाराने (92) चौथ्या दिवसाच्या खेळाची आश्वासक सुरुवात केली होती. पण मिचेल स्टार्स आणि हेझलवूड यांनी नव्या चेंडूने भेदक मारा करताना भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.
भारताचा दुसरा डाव 274 धावांवर आटोपला. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य दिले आहे. हेझलवूडने सर्वाधिक 6, स्टार्सने 2 आणि ओकेफीने 2 गडी बाद केले. अजिंक्य राहाणे (52) बाद झाला आणि भारतीय फलंदाजांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धा सुरु झाली. रहाणे बाद झाल्यानंतर 20 धावांच्या आत भारताने पाच फलंदाज बाद झाले. करुण नायर (0), चेतेश्वर पूजारा (92) बाद, आर.अश्विन (4), उमेश यादव (1) स्वस्तात बाद झाले.
नाबाद राहिलेल्या यष्टीरक्षक वृद्धीमान सहाने (20) इशांत शर्माला जोडीला घेत थोडीफार खिंड लढवल्याने भारताला आघाडी वाढवता आली. इशांतला (6) धावांवर ओकेफीने बाद केले. नव्या चेंडूने गोलंदाजी करणा-या मिचेल स्टार्सने भेदक मारा केला. त्याने अजिंक्य रहाणेला पायचीत पाकडले पाठोपाठ करुण नायरला भोपळाही फोडू न देता यष्टया वाकवल्या. त्यानंतर चेतेश्वर पूजारा (92) आणि आर. अश्विनला (4) हेझलवूडने माघारी धाडले.अजिंक्य आणि पूजाराने पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. काल 4 बाद 213 धावा करणा-या भारताकडे 126 धावांची आघाडी होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरु झाल्यापासून निराशाजनक कामगिरी करणा-या भारताने काल तिस-यादिवशी थोडी आशादायक कामगिरी केली होती. सामन्यातील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजच्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवणे आवश्यक आहे. भारताने आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांत गुंडाळला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मालिकेत प्रथमच भारताने विकेट न गमावता एक सत्र खेळून काढले. राहुल व पुजाराची जोडी लियोनने फोडली. पहिल्या स्लिपमध्ये तैनात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपत राहुलची खेळी संपुष्टात आणली. राहुलने अर्धशतकी खेळीदरम्यान कसोटी कारकिर्दीत एक हजार धावांचा पल्ला गाठला.
रहाणेने दडपणाखाली आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाची खेळी केली. भारताची ४ बाद १२० अशी अवस्था असताना पुजाराला साथ देण्यासाठी रहाणे खेळपट्टीवर आला. या जोडीने फटके खेळताना सावधगिरी बाळगली. त्यांनी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. या दोघांनी फिरकीपटू नॅथन लियोन (६९ धावांत बळी नाही) आणि स्टीव्ह ओकीफे (२८ धावांत १ बळी) यांचा मारा समर्थपणे खेळून काढला.
आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुड (३-५७) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अभिनव मुकुंद (१६) व रवींद्र जडेजा (२) यांना क्लीन बोल्ड केले. भारतीय कर्णधार विराट कोहली (१५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. मैदानी पंच नायजेल लाँग यांनी चहापानाला पाच षटकांचा अवधी शिल्लक असताना हेजलवुडच्या गोलंदाजीवर त्याला पायचित बाद दिले. कोहलीने चेंडू बॅटला लागल्याचा इशारा करताना डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. टीव्ही पंच रिचर्ड केटलबोरोने यांनी चेंडू प्रथम बॅटला लागला की पॅडला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगताना मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. कोहलीने मैदान सोडताना नाराजी व्यक्त केली. कोहली पहिल्या कसोटी सामन्यात शून्य व १३ धावा काढून बाद झाला होता, तर या कसोटीत पहिल्या डावात १२ धावांवर बाद झाला.
आणखी वाचा
पिक्चर अभी बाकी है...
भारत पहिला डाव 189
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 276