शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

विजेंदरविरुद्धच्या लढतीसाठी दहा तास सराव

By admin | Published: July 17, 2017 12:32 AM

विजेंदरसिंहला त्याच्या भूमीवर ‘धक्का’ देण्याच्या उद्देशाने डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मैमतअली

नवी दिल्ली : विजेंदरसिंहला त्याच्या भूमीवर ‘धक्का’ देण्याच्या उद्देशाने डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मैमतअली हा नॉकआऊट लढत जिंकण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी दहा तास सराव करीत असल्याचे सांगितले.डब्ल्यूबीओ आशिया पॅसेफिक मिडलवेट चॅम्पियन विजेंदरचा सामना ५ आॅगस्ट रोजी मुंबईत चीनचा नंबर वन बॉक्सर मैमत अली याच्याशी होणार आहे. ही लढत दुहेरी विजेतेपदासाठी असेल.मैमत अली म्हणाला, ‘मी प्रत्येक लढत गांभीर्याने घेतो आणि प्रत्येक वेळेस स्वत:ला त्या स्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विजेंदरला मी पराभूत करील. मी त्याच्या चाली समजतो आणि त्यानुसार तयारी करीत आहे. विजेंदरला पहिल्या दोन अथवा तिसऱ्या फेरीत नॉकआऊट करण्यासाठी मी प्रत्येक दिवशी दहा तास सराव करीत आहे. ५ आॅगस्टला विजेंदर त्याच्या खऱ्या अर्थाने व्यावसायिक कारकीर्दीत सर्वात कडव्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करील.’ २0१५ च्या पदार्पणानंतर एकही लढत न गमावलेल्या भारतीय मुष्टियोद्ध्याला नमवण्यासाठी आपण व्यूहरचना आखली असल्याचेही त्याने सांगितले.तो म्हणाला, ‘माझ्या संघाने त्याच्या सर्वच लढती पाहिल्या आहेत. विजेंदरवर जेव्हा ठोशांचा पाऊस पडेल तेव्हा तो थक्क होईल. मी लहान आहे, असा तो विचार करीत असेल; परंतु मी कोण आहे हे त्याला माहीत नाही.’ मैमतअली म्हणाला, ‘आमच्या दोघांच्याही नावावर पदार्पणानंतर एकही लढत न गमावण्याचा रेकॉर्ड आहे. नॉकआऊटमध्ये आमच्या दोघांचा रेकॉर्ड चांगला आहे, तथापि, दबाव त्याच्यावर असायला हवा. त्याला भारतात बॉक्सिंगचा बादशाहा समजले जाते. त्यानेही बादशाहाप्रमाणेच सुरुवात केली; परंतु आता या वेळेस माझे वर्चस्व असेल.’ यादरम्यान आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा अखिल कुमार आणि जितेंद्र यांच्यासह डब्ल्यूबीसी आशिया वेल्टरवेट चॅम्पियन नीरज गोयत, कुलदीप ढांढा, प्रदीप खरेरा आणि धर्मेंद्र ग्रेवाल यांच्याही लढती होतील. (वृत्तसंस्था)