लंडन : दहा संघांचा समावेश असलेला क्रिकेटचा विश्वचषक ही ‘बॅकफूट’वर आणणारी कल्पना असून, त्यामुळे क्रिकेटला आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यात अडचणी येतील. या समितीची मंगळवारी लॉॅर्ड्सवर बैठक पार पडली. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसह रिकी पाँटिंग व रमीझ राजा यासह निवृत्त होणारे राहुल द्रविड, स्टीव्ह बकनर यांनी भाग घेतला. बैठकीनंतर समितीने सांगितले, की ‘आयसीसी विश्वचषक १२ संघांचा व्हायला हवा. २०१९ आणि २०२३चे आयोजन १० संघांच्या सहभागाने व्हावे, ही बॅकफूटवर आणणारी घटना आहे. यामुळे विकसनशील देशांतील क्रिकेटचे नुकसान होईल.’ आयसीसी बोर्डाने आपल्या निर्णयावर विचार करावा, असे या समितीने आवाहन केले. पुढील १२ महिन्यांत सहभागी संघांची संख्या वाढल्यास २०२४मध्ये हा खेळ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकेल, यात शंका नाही. तळाच्या स्थानावर असलेले पूर्णकालीन आयसीसी संघ व असहयोगी देशांमध्ये पात्रता सामने खेळविण्यात यावेत. यामुळे स्पर्धा अनेक दिवस चालेल व ५० षटकांचे सामने खेळण्याची संधीही अधिकाधिक देशांना मिळू शकेल.
दहा संघांचा विश्वचषक नकोच
By admin | Published: July 16, 2015 2:21 AM