रोहित नाईक, मुंबईसर्वसामान्य भारतीयांना ‘टेनिस एल्बो’ दुखापतीचे नाव घेतल्याबरोबर सर्वप्रथम आठवतो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. २००४ साली झालेल्या या गंभीर दुखापतीमुळे सचिनला बॅट उचलणेही कठीण झाले होते. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा टेनिस एल्बोची चर्चा सुरु झाली असून यावेळी क्रिकेट नव्हे तर थेट कबड्डीमध्ये टेनिस एल्बोने ‘चढाई’ केली आहे. प्रो कबड्डीतील यू मुंबाचा स्टार खेळाडू विशाल मानेला ही दुखापत झाली आहे. खुद्द विशालनेच आपल्याला टेनिस एल्बो झाल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.टेनिस एल्बोमुळे त्यावेळी सचिन क्रिकेटपासून जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्याने त्याच्या निवृत्तीचीही चर्चा सुरु झाली होती. त्यामुळेच जेव्हा या दुखापतीचे निदान झाले तेव्हा धक्काच बसल्याचे विशाल म्हणाला. ‘यंदाच्या मोसमात सुरुवातीला दबंग दिल्लीविरुध्द खेळतानात्यांच्या कोरियन खेळाडूची पकड करताना हाताला दुखापत झाली. त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले. पणनंतर हात खूप दुखायला लागल्याने डॉक्टरकडे गेलो आणि कळाले कीही दुखापत टेनिस एल्बोची आहे.तेव्हा डॉक्टरांनी फर्स्ट स्टेज असल्याचे सांगून धीर दिला’, असे विशालने सांगितले.त्यादरम्यान ‘सॅग’ स्पर्धा जवळ आलेली असताना दडपण होते असे सांगताना विशाल म्हणाला ‘डॉक्टरांनी सतत आइसिंग करण्यास सांगताना वजन उचलण्यास सक्त मनाई केली. शिवाय काही सामने न खेळण्याचा सल्ला दिला. आइसिंग व वजन न उचलणे ठिक होतं, पण सामने न खेळणे मला जमणार नव्हते. सॅगमध्ये देशासाठी खेळायचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत मी खेळण्याचा निर्णय घेतला होता. ‘सॅग’मध्येही तिथल्या डॉक्टरांनी चांगले उपचार केल्याने फारसा त्रास झाला नाही. मात्र मुंबईत परतल्यानंतर योग्य उपचाराचा फायदा झाला.’‘यू मुंबाचे फिजिओ एस. फ्रान्सीस यांनी जे उपचार केले त्याने खूप फरक पडला असून आता मी ८० टक्के या दुखापतीतून सावरलो आहे. फिजिओच्या सूचना नियमीत पाळत असल्याने लवकरच मी पुर्ण तंदुरुस्त होईल’, असा विश्वासही विशालने यावेळी व्यक्त केला. याआधी टेनिस एल्बोची काहीच माहिती नव्हती. जे काही ऐकले होते ते केवळ सचिन तेंडुलकरमुळे. त्यामुळेच जेव्हा डॉक्टरांनी टेनिस एल्बोची दुखापत असल्याचे सांगितले तेव्हा सर्वातआधी सचिन सरांची आठवण आली. फर्स्ट स्टेज असल्याचे कळाल्यावर यातून लवकरन सावरु शकतो असा धीर मिळाला. सध्या माझ्यावर योग्य उपचार सुरु असून मी लवकरच यातून पुर्णपणे बरा होईल.- विशाल माने, यू मुंबा बचावपटू
कबड्डीमध्येही झाली ‘टेनिस एल्बो’ची एन्ट्री
By admin | Published: March 02, 2016 3:07 AM