शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
8
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
9
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
10
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
13
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
14
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
15
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
16
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
17
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
18
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
20
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?

कसोटी क्रिकेट अनमोल

By admin | Published: March 19, 2017 2:17 AM

आज उभय संघांदरम्यान मैदानावर संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. कसोटी क्रिकेटचे भविष्य म्हणून याकडे बघता येईल. फटके खेळण्याच्या नादात अभेद्य बचावाचे

- हर्षा भोगले लिहितो..आज उभय संघांदरम्यान मैदानावर संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. कसोटी क्रिकेटचे भविष्य म्हणून याकडे बघता येईल. फटके खेळण्याच्या नादात अभेद्य बचावाचे तंत्र हळूहळू लोप पावत असल्याचे भासत असताना, चेतेश्वर पुजाराने एखाद्या साधूप्रमाणे खेळपट्टीवर तळ ठोकत आज वर्चस्व गाजवल्यामुळे आयपीएलच्या युगातही कसोटी क्रिकेट अनमोल असल्याची प्रचिती आली. साधारणपणे पुजाराचा स्ट्राईक रेट डाव जसा पुढे सरकतो तसा वाढत जातो, असा अनुभव आहे, पण शनिवारी मात्र तसे घडले नाही. आॅस्ट्रेलियाच्या दर्जेदार माऱ्यापुढे दुसऱ्या टोकाकडून एक-एक सहकारी माघारी परतत असल्याचा प्रभाव त्याच्या खेळीवर झाला. त्यामुळे ६ तास २० मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकणाऱ्या पुजाराने ३०२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १३० धावांची खेळी केली. त्याची ही खेळी सामना जिंकून देण्यापेक्षा सामना वाचविणारी असली तरी त्या खेळीचे महत्त्व कमी होत नाही. त्याने ही खेळी केली नसती तर मालिकेचा निकाल आज तिसऱ्याच दिवशी निश्चित झाला असता. दोन दिग्गज फलंदाज फॉर्मात नसल्यामुळे भारतीय संघ या मालिकेत संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. कोहली व रहाणे यांचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. पुजारा व विजय यांनी सुरुवातीला डाव सावरला. आज केवळ २४० धावा फटकावल्या गेल्यामुळे ७०-८० च्या दशकाची आठवण झाली. पुजारा त्या काळातही संघाबाहेर राहिला नसता. आॅस्ट्रेलियाने पॅट कमिन्सचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याने या खेळपट्टीवर आपली उपयुक्तता सिद्ध केली. गोलंदाजीत कमिन्ससारखा वेग असेल तर खेळपट्टीचे स्वरूप दुय्यम ठरते.भारतीय संघाने चौथ्या दिवशीही जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करायला हवी. आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ९१ धावांची गरज आहे. विजयाबाबत विचार करण्यासाठी अद्याप बराच वेळ आहे. पहिल्या डावात आघाडी मिळवणे, हे पहिले लक्ष्य असायला हवे. भारतीय संघ पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला आणि खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरली तर यजमान संघाला संधी राहील. अन्यथा वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. (पीएमजी)