शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशिनियन नौकानयन स्पर्धेत थायलंडचा टोंगलम सर्वसाधारण विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 7:38 PM

ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशिनियन नौकानयन स्पर्धेत थायलंडचा टोंगलम सर्वसाधारण विजेता ठरला. 

मुंबई: 2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशिनियन नौकानयन स्पर्धेत थायलंडचा टोंगलम सर्वसाधारण विजेता ठरला. गिरगाव चौपाटीवर आठवडाभर रंगलेल्या स्पर्धेत सिंगापूरच्या जोडीने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. भारताच्या सेलर्सनीही छाप पाडली. महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्र/आर्मी यॉटिंग नोड यांचे सर्वोत्कृष्ट आयोजनाखाली झालेल्या स्पर्धेची सोमवारी सांगता झाली.

लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन यांच्या (एसएम, जीओसी, महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्र) प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सोमवारी सांगता झाली. तत्पूर्वी,  सकाळच्या सत्रात सर्व युवा सेलर्सनी समुद्रकिनारा साफसफाई कार्यक्रमात भाग घेतला. फ्लीट प्रकारात आठवडाभर चाललेल्या स्पर्धेदरम्यान झालेल्या एकूण नऊ रेसनंतर चॅनटिप टोंगलम याने 28 नेट गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सिंगापूरचा एथन चिया (43 गुण) आीण त्याचा सहकारी निकोल लिम (45 गुण) अनुक्रमे दुसरा आणि तिसरा आला. सिंगापूरचा आणखी एक सेलर अ‍ॅमोस थाम 45 गुणांसह चौथा आणि थायलंडचा प्रिन सुबयिंग 56 गुणांसह पाचवा आला. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत सुमारे सहा ते आठ नॉट्सच्या वार्‍याच्या वेगासह चांगली स्थिती होती.

पहिल्या पाच फ्लीट रेसमधील रँकिंगच्या आधारे सेलर्सना दोन गटांमध्ये (गोल्ड आणि सिल्व्हर) विभागण्यात आले. 1 ते 51 व्या क्रमांकावर असलेल्यांनी गोल्ड गटात तर  52 ते 101 क्रमांकांदरम्यानच्या सेलर्सनी गोल्ड गटात एकमेकांशी स्पर्धा केली. तत्पुर्वी, सिंगापूर वन टीमने थायलंड वन टीमला हरवून सांघिक जेतेपदाचा मुकुट पटकावला. जपान वन टीमकडून चुरशीच्या लढतीत हरल्यानंतर भारत वन संघ चौथ्या स्थानावर राहिला.

फ्लीट प्रकारात, भारताच्या शशांक बाथमने 120 नेटगुणांसह एकूण 23वे स्थान मिळवले. त्याचा सहकारी दिव्यांशी मिश्रा 120 गुणांसह 24वा आला. एकलव्य बाथम 129 गुणांसह 27व्या, आकाश महेश टंगई 134 गुणांसह 29व्या,  तनुजा कामेश्वर 40व्या, अक्षत कुमार दोहरे 43व्या तर सोम्या सिंग पटेल 46व्या स्थानावर राहिले.

एक आठवडाभर चालणारा कार्यक्रम आनंदाने भरलेल्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट वार्‍यासह परिपूर्ण परिस्थितीत आयोजित करण्यात आला. एकंदरीत, स्थळ आणि सुविधांनीही कार्यक्रमाला विलक्षण पार्श्वभूमी दिली. नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित आणि यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आर्मी यॉटिंग नोडचे (एवायएम) एक अभिनंदन करण्यात आले

 

टॅग्स :MumbaiमुंबईThailandथायलंड