शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला प्रथमच सांघिक विजेतेपद!

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 02, 2023 3:54 PM

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने चमकदार कामगिरी साधताना १४ वर्षाखालील मुलांच्या आणि १६ वर्षे वयोगटाच्या मुलींचे सांघिक विजेतेपद संपादन केले.

ठाणे :  चिपळूण येथील डेरवणमध्ये येथे पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षीय मुलांच्या गटात छाप पाडताना ठाण्याच्या प्रतीक कोळीने ट्रायथलॉन आणि लांब उडी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत राष्टीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने चमकदार कामगिरी साधताना १४ वर्षाखालील मुलांच्या आणि १६ वर्षे वयोगटाच्या मुलींचे सांघिक विजेतेपद संपादन केले.

एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात रंगलेल्या या स्पर्धेत प्रतिकने ट्रायथलॉनमध्ये एकूण १२७२ गुणांची कमाई करत आपले वर्चस्व राखले. याच स्पर्धेत ठाण्याच्या आयुष राठोडने १०४७ गुण नोंदवत कांस्यपदक जिंकले. लांब उडी स्पर्धेत प्रतिकने ५.६१ मीटर अशी कामगिरी साधत स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पक्के केले. या गटातील ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धैर्य सूर्यरावने आपला संघ सहकारी आयुष पाटीलला अवघ्या १० मिली सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. धैर्यने ही शर्यत ७.५० सेकंद अशा वेळेत पूर्ण केली. तर आयुषने ७.६० अशी वेळ नोंदवली. 

मुलींच्या १६ वर्षगटात आंचल पाटीलने उंच उडीत १.६० अशी झेप घेत पहिले स्थान पटकावले. तर हॅक्सथलॉन स्पर्धेत २८१८ गुणांसह आंचलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा ठाण्याच्या वैष्णवी गोपनरने २९५९ गुणांसह जिंकली.या गटातील १००  मीटर धावण्याच्या स्पर्धेत १२.४० सेकंद अशी कामगिरी साधत मिहिका सुर्वेने सुवर्णपदक जिंकले. श्रेष्ठा शेट्टीने ५.१८ अशी उडी मारत ठाण्याला सुवर्णपदक जिंकून दिले. ठाणे जिल्ह्याने स्पर्धेत ८ सुवर्ण, ८रौप्य आणि ५ कांस्यपदके जिंकली. सर्वश्री अजित कुलकर्णी यांनी ठाणे जिल्ह्याच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली तर श्रध्दा मान्द्रेकर संघाच्या व्यवस्थापिका होत्या.

स्पर्धेतील इतर पदक विजेते१४ वर्ष गट मुले : ६०० मीटर धावणे - १:२९:४० सेकंद , रौप्यपदक. ट्रायथलॉन : १०४७ गुण, कांस्यपदक. भाला फेक : शौर्य सिंग - २७.८८ मीटर, कांस्यपदक.मुली : उंच उडी : श्रावणी घुडे - १.३६मीटर - रौप्यपदक, लांब उडी :  ४.५० मीटर - कांस्यपदक. भालाफेक : त्रिष्मी पगारे - २१. ०३ मीटर: कांस्यपदक.१६ वर्षाखालील मुले : अभिज्ञान निकम - लांब उडी - ६.१० मीटर - कांस्यपदक. १००० मीटर रिले : टिम ठाणे ( ट्रीस्टन डिसुझा, गिरीक बंगेरा, अथर्व भोईर, अभिज्ञान निकम )२:०५:२० सेकंद - रौप्यपदक. मुली : भाला फेक : अनन्या पुजारी -३०.४५ मिटर - कांस्यपदक. १०० मीटर धावणे : शौर्या अंबुरे : १२.७० सेकंद : कांस्यपदक.  १००० मीटर मिडले रिले : टिम ठाणे ( मिहिका सुर्वे, प्रेक्षा कोलते, शौर्या अंबुरे, श्रेष्ठा शेट्टी) २:२८:२० सेकंद.

टॅग्स :thaneठाणे