पुणे : ४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने पुणे खो-खो असोसिएशन संयोजित व आंबेगाव तालुका स्पोर्ट्स अॅकेडमी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कुमारांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिकवर १८-१४ (१०-६, ८-८) असा ४ गुणांनी विजय संपादन करत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुण्याच्या राहुल मंडलने २:००, २:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, संदेश जाधवने २:००, १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, वृषभ वाघने २:००, १:२० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, आदित्य गणपुलेने १:४०, १:०० मि. संरक्षण केले तर दिलीप खांडवीने १:४०, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, मयूर वनसेने २:३०, १:१० मि. संरक्षण केले, गणेश राठोडने १:३०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र अजिंक्यपदाने पुण्यालाच वरले.
मुलींच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा ०९-०८ (५-३, ४-५) असा अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले. या सामन्यात ठाण्याच्या अश्विनी मोरेने ३:३०, २:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:२०, २:०० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले, वृत्तीका सोनवणेने नाबाद १:३०, १:२० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले व गीतांजली नरसाळेने १:४० मि. संरक्षण करत अतिशय अटीतटीच्या सामन्यात अजिंक्यपदाला गवसणी घातली तर पुण्याच्या स्नेहल जाधवने १:५०, ३:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले, ऋतुजा भोरने २:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले व दिव्या जाधवने २:३०, १:५० मि. संरक्षण करताना जोरदार लढत दिली मात्र शेवटच्या क्षणाला विजयाने दान ठाण्याच्याच पदरी टाकले.
पुरस्कारसर्वोत्कृष्ठ संरक्षकराहुल मंडल (पुणे)रेश्मा राठोड (ठाणे)सर्वोत्कृष्ठ आक्रमकसंदेश जाधव (पुणे)स्नेहल जाधव (पुणे)सर्वोत्कृष्ठ अष्ठपैलूदिलीप खांडवी (नाशिक)अश्विनी मोरे (ठाणे)