ठाणे: ठाणे जिल्हा वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप ठाणे महानगरपालिका मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा-मुंब्रा येथे २७ आणि २८ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. ठाणे महानगरपालिका प्रशिक्षण केंद्राने चॅम्पियनशिप जिंकत यात ८ सुवर्ण, १८ रौप्य आणि १० कांस्य पदके पटकावली. आकांक्षा गावडे हिने ४०० मीटरमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्ये रौप्य, आदिती पाटील हिने ८०० मीटरमध्ये सुवर्ण आणि १५०० मीटरमध्ये रौप्य, अर्पिता गावडे हिने ४०० मीटर हर्डल्समध्ये सुवर्ण आणि ४०० मीटरमध्ये रौप्य, चारवी पावशे हिने शॉट पुटमध्ये रौप्य आणि डिस्कस थ्रोमध्ये कांस्य, गार्गी डेहिने डिस्कस थ्रोमध्ये रौप्य आणि शॉट पुटमध्ये कांस्य, नतालिया फर्नांडिस हिने ४०० मीटर अडथळा आणि ४०० मीटरमध्ये कांस्य, शोभा ढोरे हिने ५ हजार मीटरमध्ये कांस्य अशी पतके महिलांनी विविध पदके पटकावली.
पुरुषांमध्ये तेजस डोंगरे याने शॉट पुट आणि डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण, हर्ष राऊतने १०० मीटरमध्ये सुवर्ण, आकाश शिंदेने उंच उडीत सुवर्ण आणि ११० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य, अली शेखने ४०० मीटर अडथळा आणि ४०० मीटरमध्ये रौप्य, ऋषभ यादवने - ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य, अभिषेक बोऱ्हाडेने १५०० मीटरमध्ये रौप्य आणि ८०० मीटरमध्ये कांस्य, विनायक थळेने उंच उडीत रौप्य, आल्फ्रेड फ्रान्सिस ८०० मीटरमध्ये रौप्य, तनिश चड्ढाने २० किमी शर्यतीत कांस्य, कृष्णा मोरेने भालाफेक आणि उंच उडीमध्ये कांस्य, अली शेख, अल्फ्रेड फ्रान्सिस, अंकित पाल आणि अभिषेक बोऱ्हाडे यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्य, हनुमंत अनपट, प्रथमेश म्हात्रे, तजमुल शेख आणि हर्ष राऊत यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये रौप्य, ऋषभ यादव, राहुल यादव, कौशिक भोईर आणि निमेश गावडे यांनी ४ x ४०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.
आमच्या खेळाडूंनी पुरुष आणि महिला गटात वर्चस्व गाजवले. ठाणे महापालिका प्रशिक्षण केंद्राने ओव्हरऑल चॅम्पियनशिप जिंकली. ही आमची सलग तिसरी अजिंक्यपद स्पर्धा आहे. नवीन हंगामासाठी ही चांगली सुरुवात आहे. मला विश्वास आहे की आगामी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये आम्ही आमची कामगिरी सुधारू, असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले.