ठाणे : बांगलादेशाची राजधानी ढाका येथे ५ते १० डिसेंबर दरम्यान रंगलेल्या पहिल्या सार्कआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखने आपले वर्चस्व राखताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. या यशाबद्दल नुबैरशाहला सुवर्णपदकासह तीन हजार पाचशे अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत त्याला तिसरे मानांकन मिळाले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नुबैरशाहसमोर सातव्या फेरीत पाकिस्तानचा अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर मेहमूद लोधीचे आव्हान होते.सामन्यात पांढºया मोहºयानिशी खेळणाºया लोधीने आक्र मक सुरु वात केली होती.
त्याला नुबैरशाहने स्लॉव्ह बचावाने उत्तर देऊन लोधीला विचार करण्यास भाग पाडले. त्यांनतर लोधीने फियानचेट्टी व्हेरिएशन पद्धतीने खेळ करत सामन्यात वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न हाणून पडताना नुबैरशाहने घोड्याची चाल खेळत सामन्यात रोमांचकारी स्थिती निर्माण केली. त्यात नुबैरशाहने एकापेक्षा एक सरस चाली रचून बचावात्मक खेळ करणाºया लोधीला सामना मध्यावर सोडण्यास भाग पाडले. या विजयामुळे सात गुणांसह स्पर्धेतील विजेतेपदाकडे घेऊन जाणारी निर्णायक एक गुणांची आघाडी त्याने मिळवली.
या आघाडीनंतर शेवटच्या नवव्या फेरीत त्याचा सामना बांगलादेशचा ग्रँडमास्टर आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित झिया उर रहमानशी झाला. या सामन्यात नुबैरशाहला काळया मोहऱ्यांनिशी डावाची सुरु वात करावी लागली. या सामन्यात त्याने सिसिलियन बचाव पद्धत अवलंबवत रहमानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. नुबैरशाहने त्यानंतर अँड्रफ व्हेरिएशन आणि थ्रेफॉल व्हेरिएशन स्थिती तयार करत विजेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवण्यासाठी आवश्यक असलेला गुण निश्चित करत सामना बरोबरीत राखला आणि आपल्या खात्यात १८ वे आंतरराष्ट्रीय पदक जमा केले आहे.