मुंबई : आगामी ११ ते १५ डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश मधील आझमगड येथे रंगणाऱ्या ३६ व्या कुमार व मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या महाराष्ट्र कुमार संघाच्या कर्णधारपदी ठाण्याच्या संकेत कदमची वर्णी लागली आहे. तर मुलींच्या संघाची धुराही ठाण्याच्याच कविता घाणेकरकडे सोपविण्यात आली आहे.गेल्या दोन मोसमात राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले आहे. कुमार संघ सलग ७ वर्षांची विजयी मालिका कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. नुकताच नागपूर येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने बाजी मारली. या संघातील चार खेळाडूंचा ज्युनिअर संघात समावेश असल्याने विजेतेपदाचा दावेदार म्हणून महाराष्ट्राच्या मुलींकडे पाहिले जात आहे. शिवाय गेल्या वर्षी ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या कविता घाणेकरच्या खांद्यावर संघाची धुरा असल्याने तीच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल. (क्रीडा प्रतिनिधी)महाराष्ट्र संघ :कुमार : संकेत कदम (कर्णधार), शुभम उतेकर, आकाश तोरणे, जितेश म्हसकर (सर्व ठाणे), निहार दुबळे जयेश गावडे, आशिष वने (सर्व मुंबई उपनगर), प्रतिक बांगर, आकाश खाडे (सर्व पुणे), निखिल कांबळे (मुंबई), तेजस मगर (अहमदनगर), विश्वजीत फारणे (सांगली)मुली : कविता घाणेकर (कर्णधार), प्रियांका भोपी, रेश्मा राठोड (सर्व ठाणे), काजल भोर, प्रणाली बेनके, कोमल दारवटकर (सर्व पुणे), प्रतिक्षा खुरंगे (सातारा), अपेक्षा सुतार (रत्नागिरी), मधुरा पेडणेकर (मुंबई), धनश्री भोसले (सांगली), किरण गव्हाणे (अहमदनगर), वैष्णवी भड (उस्मानाबाद).
ठाणेकर करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
By admin | Published: November 08, 2016 4:09 AM