त्रिवेंद्रम (केरळ) : भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वात मोठी जल क्रीडा स्पर्धा अशी ओळख असलेल्या केरळ चॅम्पीयन बोट लिग स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी केरळमधील कोल्लम येथील प्रसिद्ध प्रेसिडेन्ट ट्राॅफी बोट रेसवर रंगणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण केरळमध्ये मोठी उत्सुकता असून बोट रेसच्या देश-विदेशातील चाहत्यांनीही कोल्लम येथे गर्दी केली आहे.
पावसाळ्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दरवर्षी केरळचा शांत बॅक वाॅटर बदललेला असतो, कारण येथे ही स्पर्धा इंडियन प्रिमिअर लिगच्या धर्तीवर रंगलेली असते. यंदा या स्पर्धेसाठी अभूतपूर्व उत्साह आहे. कारण कोविडमुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर ही स्पर्धा रंगते आहे. या स्पर्धेच्या १२ पैकी ११ विकेन्ड शर्यती संपल्या असून अंतिम सामना उद्या शनिवारी नेहरु बोट रेस येथे सुरू होत आहे. एकूण सात कोटींचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये ट्राॅपिक टायटल ८८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर मायटी बाेर्स दुसऱ्या, रॅंगिग रोवर्स तिसऱ्या स्थानावरुन असून विविध भागातील नऊ संघ ही २०२२ बोट लिग जिंकण्यासाठी झुंज देणार आहेत.
स्पर्धेचा ट्रॅक साधारण एक किलोमीटर लांबीचा असून ही बोट स्पर्धा केरळच्या शेती संस्कृतीचा अभिवाज्य भाग समजला जाते. या स्पर्धेमुळे केरळच्या पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असून नागरिकांत स्पर्धेमुळे सामाजिक एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. या सीबीएल स्पर्धेमुळे एखाद्या पारंपारिक सणासारखे वातावरण बॅक वाॅटरच्या काठावर निर्माण झाले असून रोव्हींगचे कौशल्य आणि अचूक समन्वय याची अनुभूती घेण्यासाठी केरळकर नागरिक सज्ज झाले आहेत.
नऊ चॅम्पीयन स्नेक बाेटींगकडे लक्ष चॅम्पीयन बोट लिग २०२२ या स्पर्धेला ४ सप्टेंबरला प्रारंभ झाला असून उद्या शनिवारी अंतिम सामना होत आहे. साधारण २८०० रोअर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. साधारणपणे एका बोटीमध्ये ९५ रोअर्स असतात. तर ७ ते १० स्टॅन्डी असतात. स्पर्धेचा एक किमीचा ट्रॅक कोणती बोट सर्वात कमी वेळेत पूर्ण करते, यावर विजेता ठरतो.