गुरुग्राम : आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले.मेरीकोमने व्हिएतनाम येथील हो चि मिन सिटी येथे आशियाई स्पर्धेत ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. ती म्हणाली, ‘जोपर्यंत मी कठोर मेहनत कायम ठेवेल आणि माझे शरीर तंदुरुस्त राहिल्यास मी कोणालाही पराभूत करू शकते. जर मी माझ्या फिटनेसचा स्तर कायम ठेवल्यास माझ्या जवळपास कोणीही पोहोचू शकत नाही.’ पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीकोमने बराच वेळ ५१ किलो वजन गटात खेळल्यानंतर पुन्हा ४८ किलो वजन गटात पुनरागमन केले. २०१० मध्ये ५१ किलो वजन गटाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. मेरीकोम म्हणाली, ‘जर ४८ किलो हा वजन गट आॅलिम्पिक वजन गटात समाविष्ट केल्यास चांगले होईल. यात मी चांगली कामगिरी करतेय.’ ही मणीपूर येथील बॉक्सर अॅथलिट फोरममध्ये सहभाग नोंदवण्यासाठी लुसानेला रवाना होणार आहे. तेथे ती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) प्रतिनिधित्व करील.
...तर कोणालाही पराभूत करू शकते : मेरीकोम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 3:01 AM