शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

...तर खेळाडूंचे खच्चीकरण होईल-  प्रणॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:40 AM

आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या फटका बसण्याची भीती

नवी दिल्ली : कोरोनामुळे क्रीडाक्षेत्रातील परिस्थिती निराशादायी असून पुढील दीड महिन्यात सुधारणा न झाल्यास खेळाडू आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातील, अशी भीती भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने गुरुवारी व्यक्त केली.

कोरोनाने जगात आतापर्यंत ४४ हजार बळी घेतले आहेत. अनेक देशात लॉकडाऊन आहे. बॅडमिंटनसह जगातील अनेक खेळांच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडूंमध्ये आर्थिक तसेच मानसिक ग्लानी निर्माण झाली असल्याचे मत प्रणॉयने व्यक्त केले.राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता असलेला एच. एस. प्रणॉय हसीना सुनील कुमार (पूर्ण नाव) म्हणाला, ‘कुठल्याही उद्योगासाठी ही वेळ फार कठीण आहे. कोरोनामुळे उत्पादन बंद असल्याने नफ्यावर परिणाम होत आहे. याचा फटका खेळाडूंना बसला. अनेक कंपन्या खेळाडूंच्या प्रायोजक आहेत. यामुळे खेळ आणि खळाडूंवर विपरित परिणाम होत चालला आहे.

प्रायोजकांनी अन्य खेळांवर देखील मोठी गुंतवणूक केली आहे, मात्र खेळ बंद पडल्यामुळे बॅडमिंटनसह सर्वच खेळ प्रभावित झाले. खेळाडूंना आता काहीच ठिकाणांहून अत्यल्प कमाई होत आहे. ती देखील थांबल्यास खेळाडूंपुढे मोठे संकट उभे राहणार याची मला जाणीव आहे. पुढील दीड महिन्यात परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मी प्रार्थना करीत आहे.’

अनेक ग्रॅन्डस्लॅमची विजेती असलेली अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि आॅस्ट्रेलियाचा दिग्गज जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांच्यासह अनेक खेळाडूंनी ‘लॉकडाऊन’मुळे खेळाडूंची मानसिकता खचत असल्याची भीती आधीच व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

समस्येकडे सकारात्मक दृष्टीने बघावे

४ प्रणॉय पुढे म्हणाला,‘ अनेक खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत, माझ्यामते ८० टक्के खेळाडू मैदानावर परतण्यास उत्सुक दिसतात. ही समस्या केवळ खेळाडूंपुरती मर्यादित नाही तर जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मानसिक समस्या बनली आहे. मात्र सध्यातरी आमच्याकडे कुठला पर्याय नाही. आम्हाला या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहावे लागेल. दैनंदिन आयुष्यात जे काही करीत आहोत त्याचाच आनंद लुटायचा आहे. व्यावसायिक व्यस्ततेमुळे इतकी वर्षे जे करू शकलो नााहीत त्या गोष्टी करा. कुटुंबासोबत वेळ घालवा.’

४ विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) १७ मार्चची विश्व रँकिंग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रणॉयने या निर्णयाचे स्वागत केले. शिवाय खेळाडूंचे प्राथमिक हित निश्चित करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या