ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5- महेंद्र सिंग धोनीनं वन-डे आणि टी-20मधून निवृत्त होण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मी आनंदीत आहे, असं वक्तव्य क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी केलं आहे. झारखंडचा हा यष्टिरक्षक संघात आणखी चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो. सुनील गावसकर म्हणाले, महेंद्र सिंग धोनीनं खेळाडू म्हणून संन्यास घेतला असता तर संघात त्याला परत आणण्यासाठी मी त्याच्या घरासमोर धरणे धरणारा पहिला व्यक्ती ठरलो असतो. एक खेळाडू म्हणून तो जबरदस्त आहे. तो एका षटकात मॅचचं भविष्य बदलून टाकतो. भारताला एका खेळाडूच्या रूपात त्याची गरज आहे. मला आनंद आहे की त्याने खेळाडू म्हणून संघात खेळण्याचा निर्णय घेतला. धोनी कर्णधार नसल्यानं त्याच्यावर आता दबाव नसणार आहे, त्यामुळे त्याची फलंदाजी आणि यष्टिरक्षण आणखी बहरणार आहे. कोहली नक्कीच त्याला 4 किंवा 5 स्थानावर फलंदाजाच्या स्वरूपात मैदानात उतरवेल. कारण त्याच्या खाली उतरवल्यास त्याच्या फलंदाजीला काही अर्थ राहणार नाही. धोनी चांगला फिनिशर असल्यानं 4 किंवा 5 स्थानी खेळूनही तो मॅच फिनिशरची भूमिका निभावू शकतो. आता त्याचे यष्टिरक्षण आणखी चांगले होईल. तसेच धोनी आणि कोहली हे मैदानात एकमेकांना पूरक ठरतील. त्यामुळे मॅचमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारताला नक्कीच मदत मिळेल.
...तर धोनीच्या घरासमोर ठाण मांडले असते - गावसकर
By admin | Published: January 05, 2017 5:05 PM