शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

विशेष आमसभेसाठी सीओएच्या परवानगीची गरज नाही : राय

By admin | Published: March 30, 2017 7:41 PM

प्रशासकांच्या समितीची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे महत्त्वाचे स्पष्टीकरण सीओए प्रमुख विनोद राय यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - बीसीसीआय अधिकाऱ्यांना विशेष आमसभा बोलविण्यासाठी प्रशासकांच्या समितीची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे महत्त्वाचे स्पष्टीकरण सीओए प्रमुख विनोद राय यांनी दिले आहे. आयपीएल संचालन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरात राय म्हणाले, विशेष आमसभा बोलविण्यासाठी बीसीसीआयला सीओएची परवानगी घेण्याची गरज नाही. पण आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळायला हवी. विशेष आमसभेत घेतलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध नसतील तर त्या निर्णयांनादेखील सीओएची मंजुरी मिळविणे अनिवार्य नाही. विशेष आमसभा ९ एप्रिललाच होईल का, असे विचारताच राय म्हणाले, यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राजजीव शुक्ला यांनी भूषविले. शुक्ला आयपीएल अध्यक्षपदी कायम राहतील, असे राय यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने राय यांना हटविण्याचे आदेश दिलेले नाहीत. जुनीच संचालन परिषद कायम असेल. बैठकीतूनकाही अधिकारी वॉक आऊट करतील, अशी शंका होती का, या प्रश्नाच्या उत्तरात राय हसून म्हणाले, हा मीडियाचा प्रचार आहे.बैठकीत कुठलाही कडवटपणा नव्हता, खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले. आयपीएल संचालन परिषदेच्या सदस्यांमध्ये पी. व्ही. शेट्टी, सौरभ गांगुली, सी. के. खन्ना आणि अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश होता. अमिताभ चौधरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. ज्योतिरादित्य शिंदे अनुपस्थित होते तर एम. पी. पांडोव हे ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्याने अपात्र घोषित करण्यात आले.संचालन परिषदेचे निर्णयमुंबईला मिळाला आयपीएल-१० चा प्ले आॅफ सामना. गतवर्षी दुष्काळामुळे मुंबईतील सामना इतरत्र हलविण्यात आला होता.आयपीएल उद्घाटन समारंभात सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग या पाच माजी दिग्गजांचा सन्मान होणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंना एकरकमी गौरव निधी त्यांच्या शहरातील आयपीएल सामन्यादरम्यान वितरित करण्यात येईल.