शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

माझ्या सराव पद्धतीत कुठलीच उणीव नाही : युकी

By admin | Published: April 04, 2017 12:28 AM

भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरीने सरावाच्या पद्धतीमध्ये कुठली उणीव नसल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दुखापतीमुळे डेव्हिस कप लढतीतून बाहेर झालेला भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरीने सरावाच्या पद्धतीमध्ये कुठली उणीव नसल्याचे स्पष्ट केले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे युकीने सात एप्रिलपासून उज्बेकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीतून माघार घेतली आहे. युकीची कारकीर्द दुखापतीमुळे गाजली आहे. त्याला व्यावसायिक टेनिसमध्ये आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. यंदा त्याने चेन्नई ओपनसाठी पात्रता मिळवली होती आणि चीनमध्ये दोन चॅलेंजर पातळीच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला डेव्हिस कप एशिया ओशियाना गटातील लढतीत खेळता येणार नाही. युकीने चमकदार पुनरागमनाची आशा व्यक्त करताना सांगितले की, ‘दुखापत गंभीर नाही, पण चुकीच्या वेळी उद््भवली आहे. मी या महिन्याचे अखेर पुनरागमन करणार आहे.’युकीच्या अनुपस्थितीचा संघाच्या संयोजनावर परिणाम होणार आहे. नॉन प्लेइंग कर्णधार महेश भूपतीला आता लिएंडर पेस किंवा रोहण बोपन्ना यांच्यापैकी एकाचा संघात समावेश करावा लागणार आहे. कर्णधार भूपतीने खेळाडूंसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यातील एक नियम म्हणजे ‘सर्वंच खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी फिटनेस सिद्ध करवा लागणार आहे.’फिटनेस चाचणी दिली का, याबाबत बोलताना युकी म्हणाला, ‘मला फिटनेस चाचणी द्यायची होती, पण मी खेळू शकणार नाही, याची मला कल्पना आली होती. पुढच्या लढतीपर्यंत फिट होईल आणि चाचणीला सामोरे जाईल.’भूपतीच्या नेतृत्वाखाली खेळल्याशिवाय त्याच्याबाबत वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. प्रत्येक कर्णधाराची शैली वेगळी होती. आनंद अमृतराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यात मला आनंद मिळाला. (वृत्तसंस्था)महेशबाबतही सर्व चांगलेच घडेल. फिटनेस चाचणीमध्ये कुठली अडचण नाही. संघासाठी ते फायद्याचे आहे.’ (वृत्तसंस्था)>दुखापतीमुळे संघाबाहेर राहणे मला आवडत नाही. माझ्या सरावामध्ये कुठली उणीव नाही, पण अनेकदा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. - युकी भांबरी