शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सिंधूकडून आणखी चांगली कामगिरी होईल

By admin | Published: December 22, 2016 12:23 AM

सिंधूसाठी यंदाचे वर्ष अप्रतिम राहिले. नुकताच झालेला दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्समध्ये ती प्रत्येक सामन्यात चांगली खेळली.

मुंबई : ‘सिंधूसाठी यंदाचे वर्ष अप्रतिम राहिले. नुकताच झालेला दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्समध्ये ती प्रत्येक सामन्यात चांगली खेळली. विशेष म्हणजे तिने ज्याप्रकारे या स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला ते लक्षवेधी होते. तिच्याकडून भविष्यात आणखी चांगली कामगिरी होईल,’ अशा शब्दांत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचे कौतुक केले.बुधवारी मुंबई प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या मुंबई रॉकेट्स संघाच्या जर्सीचे अनावरण झाले. यावेळी गोपीचंद बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘सिंधू भलेही उपांत्य सामन्यात सुंग जी ह्यूनविरुद्ध पराभूत झाली असेल. परंतु, त्या सामन्यात सुंगचा खेळ खरंच अप्रतिम होता. तो शानदार सामना होता. एकूणच सिंधूसाठी वर्ल्ड सुपरसीरिज लढत खूप चमकदार ठरली.’सिंधूकडून याहूनही अधिक शानदार कामगिरी करण्याची क्षमता असल्याची सांगताना गोपीचंद म्हणाले की, ‘मी नेहमीच सिंधूविषयी सांगत आलो आहे. जेव्हा तिने सलग दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकले, तेव्हाही मी याहून चमकदार कामगिरी करेल असे मी सांगितले होते. मी आताही हेच सांगेन की, तिची अजून सर्वश्रेष्ठ कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल.’त्याचप्रमाणे ‘आज ज्या स्तरावर सिंधू आली आहे, त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. अनेक नावाजलेले खेळाडू तिच्याविरुद्ध खेळण्याआधी दोन वेळा विचार करतात. दबावात तिने चमकदार कामगिरी केली आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असेही गोपीचंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)