शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

त्यामुळे कळाले चॅम्पियन बनण्याचे महत्त्व - अंकित बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 9:06 PM

गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद, दि.३० - गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील रणजी फायनलमध्ये पराभव पत्करल्याचे शल्य आहे. २१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राने हा सामना गमावला आणि त्याच वेळेस विजेतेपद पटकावण्याचे काय महत्त्व असते याची जाणीव आपल्याला झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. २0१३-२0१४ च्या हंगामात महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजाविणारा अंकित बावणे इंग्लंडचा दौरा आणि त्यानंतर चेन्नई येथील बीसीसीआयची मान्यता असणाऱ्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सन्मार इंडिया केम्पलास्ट या संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८८ च्या सरासरीने २६५ धावा फटकावल्यानंतर औरंगाबादेत आला होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.२0१३-२0१४ या हंगामात महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीत अंकित बावणे याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध संघ संकटात सापडला असताना ८९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध ८९ आणि अंतिम फेरीत कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करताना आपला विशेष ठसा उमटवला होता. त्या वेळेस त्याने ६६.४५ या जबरदस्त सरासरीसह ११ सामन्यात ७३१ धावांचा पाऊस पाडला होता. तथापि, एवढ्या सुरेख कामगिरीनंतरही अंतिम फेरीत विजेतेपद पटकावता न आल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. २0१३-२0१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतील फायनल आम्ही जिंकू शकलो नाही याची खंत वाटते. त्यानंतर जीवनात फायनल जिंकण्याचे महत्त्व कळाले. आता आपले पहिले ध्येय म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन बनविण्याचे आहे. महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन झाला की, आपोआप माझी स्वत:ची कामगिरीही उंचावणार आहे आणि माझ्यासाठी भारताच्या सिनिअर संघाची दारे उघडणेदेखील सुकर होईल याचा विश्वास वाटतो, असे अंकित बावणे याने सांगितले.बीसीसीआयचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के आणि रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी नेहमीच युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आमच्या संघाला पाठिंबा दिला आहे. पडत्या काळातही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या गेल्या तीन हंगामांपासून आमची कामगिरी उंचावत आहे. आमचे नवीन प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांचा अनुभव आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गाठीशी अनुभवदेखील आहे आणि महाराष्ट्राला रणजीत चॅम्पियन बनवून अजय शिर्के व बागवान यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी संघावर आहे, असे अंकित म्हणतो. यंदा रणजी ट्रॉफीचे सामने तटस्थ स्थळी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामनेदेखील परराज्यात होणार आहेत. ही फलंदाजांसाठी चांगली संधी असणार आहेत. याचा लाभ दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना समसमान असणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचे वेळापत्रक व स्थळ जाहीर झाल्यानंतर त्या स्थळानुसार आपण सराव करणार असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. अंकित भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. विराटमध्ये आक्रमकता, फिटनेस, क्रिकेटबद्दलची जिद्द व इनिंग बिल्ट करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलो असल्याचे त्याने सांगितले. कारकीर्दीतील हरियाणाविरुद्धची खेळी आपली संस्मरणीय असल्याचे अंकित म्हणतो. अंकितने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असतानाही १७२ धावांची खेळी करीत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता.