ललित झांबरे : आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये किती स्पर्धा आहे हे सांगण्याची गरज नाही अशावेळी एखादी अवघ्या 15 वर्षांची खेळाडू सध्या सक्रिय असलेल्या सर्वाधिक वयाच्या खेळाडूला पुन्हा पुन्हा नमवत असेल तर चर्चा तर होणारच. सध्या अशीच चर्चा अमेरिकेच्या कोको गाॕफची होतेय.
सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत तिने दिग्गज व्हिनस विल्यम्स हिला 7-6, 6-3अशी मात दिली. यंदाच्या महिला एकेरीतील सर्वात कमी वयाची खेळाडू (15 वर्षांची कोको) विरुध्द सर्वाधिक वयाची खेळाडू (39 वर्षांची व्हिनस) अशी ही लढत होती. साहजिकच तिच्याकडे सर्वांचे लक्ष होते.
गेल्यावर्षीच्या विम्बल्डनमध्येही असेच घडले होते आणि त्यावेळीसुध्दा कोकोच विजेती ठरली होती. गेल्यावर्षी कोको'ने विम्बल्डनच्या चौथ्या फेरीपर्यंत तर युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
यासह 'सोलह बरस की' होण्याआधीच ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या मेन ड्रॉचे एकाहून अधिक सामने जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये तिने स्थान मिळवले आहे.
16 वर्षे वयापेक्षा कमी वयातच ग्रँड स्लॕम स्पर्धांतील सर्वाधिक विजय
विजय-- खेळाडू -------------- कालावधी28----- जेनिफर कॕप्रियाती--1990 ते 9220----- मार्टिना हिंगिस ------ 1995-9613----- कॕथी रिनाल्डी ------- 1981-8212----- स्टेफी ग्राफ ----------- 1983-8511----- मेरी जो फर्नांडीस --- 1985- 8709----- गॕब्रिएला साबातिनी-- 1984- 8506----- मॕग्दालेना मलिव्हा---- 1990- 9106----- मॕन्युएला मलिव्हा----- 198206----- कोरी गॉफ-------------- 2019-2005------ कॕरातान्तेचेव्हा---------2004-05