दुबई: कोरोनाविरुद्ध लढाईत एकजुटता सिद्ध करण्यासाठी द. आफ्रिकेतील एका दाम्पत्याने दुबईतील स्वत:च्या अपार्टमेंटमधील बाल्कनीत मॅरेथॉन शर्यतीचे अंतर पूर्ण केले. त्यांनी आॅनलाईन स्ट्रीमिंग करीत स्वत:ची योजना जागतिक स्तरावर पोहचविण्याची योजना आखली आहे.
४१ वर्षांचे कोलिन आणि त्यांची पत्नी हिल्दा यांनी शनिवारी ४२.२ किलोमीटर हे अंतर (जवळपास २६ मैल) २० मीटर अंतराच्या बाल्कनीत २१ हजारांहून अधिक फेऱ्या मारून गाठले. त्यांच्या स्टॉपवॉचनुसार हे अंतर पूर्ण करण्यासाठी दोघांना ५ तास ९ मिनिटे आणि ३९ सेकंद इतका वेळ लागला.
स्वत:च्या इन्स्टाग्रामवर एलिन यांनी लिहिले,‘आम्ही साकार केली बाल्कनी मॅरेथॉन...!’ त्यांनी पहिल्यांदा मॅरेथॉन धावणाºया पत्नीचे देखील कौतुक केले.
मॅरेथॉन लाईव्ह पाहून आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही काही वेगळे करण्याचा विचार केला होता. आमचा उत्साह वाढविणाºया सर्वांचे आभार.’ या दाम्पत्याची १० वर्षांची मुलगी गिना हिने रेस संचालिकेची भूमिका निभावली. (वृत्तसंस्था)