मुंबई : निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा समितीद्वारा सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यास टाळाटाळ करीत असल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या विशेष साधारण सभेमध्ये (एसजीएम) लोढा शिफारशींना पूर्णपणे मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय बीसीसीआयपुढे नसेल.लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयचे नियम आणि दिशानिर्देशनांवर विचार करण्यासाठी ही एसजीएम बोलविण्यात आली आहे. त्याचवेळी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर, या शिफारशी लागू करण्याबाबत आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचा बचाव करण्याविषयी बीसीसीआयला योग्य मार्ग काढावा लागेल. लोढा समितीने आपल्या शिफारशींना लागू करण्याबाबत होत असलेल्या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली होती. (क्रीडा प्रतिनिधी)
शिफारशी लागू करण्यासंबंधी विचार होणार
By admin | Published: September 30, 2016 5:02 AM