विम्बल्डन टेनिस : मार्कस् विलिस पराभूत; महिलांच्या गटात जोनाथन कोंटा दुसऱ्या फेरीतलंडन : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पार्ट टाईम कोच व खेळाडू मार्कस् विलिसचा सरळ तीन सेटमध्ये सहज पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
तिसरा मानांकित रॉजर फेडररविरुद्ध विलिसच्या होणाऱ्या या पुरुष एकेरीतील लढतीची चर्चा जोरात सुरू होती. अनुभवी फेडररने सलग तीन सेटमध्ये विलिसचा ६-०, ६-३, ६-४ गुणांनी सहज पराभव केला. महिलांच्या एकेरीत ब्रिटनचा नंबर वन खेळाडू जोनाथन कोंटाने पुएर्टो रिकोच्या मोनिका पुइगचा सरळ दोन सेटमध्ये ६-१, ७-५ गुणांनी पराभव करून विम्बल्डन स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला.
या लढतीच्या वेळ पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन वेळा खेळ थांबवावा लागला होता. गतवर्षी जागतिक मानांकनात १२६ व्या क्रमांकावर असलेल्या कोंटाने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या मानांकनात सुधारणा केली. तिला या वेळी १६ मानांकन देण्यात आले. ती आॅस्ट्रेलियान ओपनच्या उपांत्यफेरीपर्यंत पोहोचली होती. दुसऱ्या फेरीत कोंटाचा सामना कॅनडाच्या युजिनी बुकार्डविरुद्ध होणार आहे. बुकार्डने स्लोवाकियाच्या एम. रिबारिकोव्हाला ६-३, ६-४ गुणांनी नमविले आहे. दुसरीकडे सातवी मानांकित स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिसने बुल्गारियाच्या पिरोनकोव्हाला ६-२, ६-३ असे नमविले. (वृत्तसंस्था)