Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले आणि त्यांनी अंतिम सामन्यात ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर ३-० असा विजय मिळवला. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.
आतापर्यंत केवळ सहाच देशांना #ThomasCup जिंकता आलेला आहे. त्यात सर्वाधिक १४ जेतेपदं इंडोनेशियाच्या ( १९५८-२०२०) नावावर आहेत. त्यानंतर चीनच्या नावावर १० ( १९८२-२०१८), मलेशियाच्या नावावर ५ ( १९४९-१९९२) आणि जपान ( २०१४), डेन्मार्क ( २०१६) व भारत ( २०२२) यांच्या नावावर प्रत्येकी १ जेतेपद आहे. भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. भारत सरकारने संघाला १ कोटींचे बक्षीस जाहीर केले.