बँकॉक : पीव्ही सिंधू तसेच किदाम्बी श्रीकांत यांच्या अनुपस्थितीत आजपासून सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक गटात भारताची भिस्त अनुभवी सायना नेहवाल आणि एचएस प्रणय यांच्या कामगिरीवर असेल. भारतीय महिला संघाने मागील दोनवेळा या स्पर्धेत कांस्य पदक जिनकले आहे. पुरुष खेळाडू मात्र गेल्या आठ वर्षांत थॉमस चषकात उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करु शकले नाहीत.पुरुष संघात विश्व क्रमवारीत नवव्या स्थानावरील प्रणयसह सिंगापूर ओपनचा विजेता बी. साईप्रणित, स्विस ओपन विजेता समीर वर्मा, आणि ज्युनियरमध्ये विश्व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन यांचा समावेश आहे. दुहेरीची भिस्त राष्टÑीय चॅम्पियन मनू अत्री- बी. सुमित रेड्डी तसेच एमआर अर्जुन- श्लोक रामचंद्रन यांच्या कामगिरीवर असेल. भारताचा अ गटात आॅस्ट्रेलिया, झ्रान्स आणि बलाढ्य चीनसह समावेश आहे.महिला संघ अ गटात कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि दिग्गज जपान संघांसोबत असून उपांत्यपूर्व फेरीसाठी पहिल्या दोन स्थानांवर रहावे लागणार आहे. महलिा संघात सिंधूसह दुहेरीत अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांचीही उणिव जाणवेल. सायनाने स्वत:चे सामने जिंकले तरी जपान आणि कॅनडाविरुद्ध संघातील सहकारी वैष्णवी रेड्डी, साई कृष्णप्रिया, अनुरा प्रभुदेसाई आणि वैष्णवी भाले यांनी आपापले सामने जिंकावेत, यासाठी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करावे लागणार आहे. दुहेरीत प्राजक्ता सावंत- संयोगिता घोरपडे, पूर्वीशा राम- मेघना या जोडींकडून काहीशा अनपेक्षित कामगिरीची अपेक्षा राहील. (वृत्तसंस्था)आव्हान कडवे आहे. आमचा संघ युवा आहे. पदक जिंकण्यासाठी आधी फ्रान्सला हरवून बाद फेरी गाठण्यावर भर असेल. उपांत्यपूर्व फेरीत कोरिया किंवा इंडोनेशियासारख्या संघाविरुद्ध लढत झाली तरी एकेरीत आम्हाला भरपूर संधी असेल.- बी. साईप्रणित, भारतीय बॅडमिंटनपटू.
थॉमस-उबेर चषक: भारतीय बॅडमिंटनपटूंना कडवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:11 AM