रिओ : आॅलिम्पिक आटोपून केवळ तीन दिवस झाले. या आयोजनादरम्यान अनेक क्रीडा संघटनांसोबत अफरातफरी झाल्याची प्रकरणे गाजली आहेत. यासंदार्भात तिघांना ताब्यात घेतले आहे.फेडरल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही गुंडप्रवृत्तीच्या टोळीने ब्राझील नेमबाजी संघटना तसेच ब्राझील तायक्वांडो संघटनेला टार्गेट करीत त्यांना फसविले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने विविध संघटनांना आर्थिक साहाय्य दिले होते. या टोळक्याने बनावट योजना तयार करीत दोन्ही संघटनांची फसवणूक केली. क्रीडा संघटनांसोबत झालेल्या अफरातफरीचा तपास वर्षभरापूर्वीपासून सुरू आहे. त्यात आरोपी बनावट दस्तावेज सादर करीत निविदेतच अफरातफर करतात, असे पोलिसांना आढळून आले. काही क्रीडा साहित्याच्या खरेदीत बाजारभावापेक्ष़ा चढ्यादराने वसुली केली जाते. ब्राझील पोलिसांनी या प्रकरणी चार राज्यांत धाड टाकली. तपासाअंती काही लोकांना अटक केली. दरम्यान न्यायाधीशांनी तायक्वांडो संघटनेच्या अध्यक्षांना पदावरून पायउतार होण्याचा आदेश दिला आहे. (वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिक हेराफेरी केल्याप्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: August 26, 2016 3:46 AM