मुंबई : नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे हक्काचे व्यासपीठ असलेल्य ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा थरार २४ नोव्हेंबरला लालबाग येथील गणेशगल्ली येथे रंगणार आहे. सुमारे २०० हून अधिक युवा शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून यंदा जेतेपद मिळवण्यासाठी कडवी झुंज रंगेल.प्रत्येक युवा शरीरसौष्ठवपटूसाठी ही स्पर्धा कारकिर्दीची पहिली पायरी मानली जाते. विशेष म्हणजे एकही स्पर्धा न जिंकलेल्या युवा खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश दिला जात असल्याने प्रत्येक स्पर्धकासाठी ही स्पर्धा स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असते. ग्रेटर मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन होत असलेल्या या स्पर्धेत रोख पारितोषिकही ठेवण्यात आले आहेत.५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८०किलो वरील अशा एकूण सात वजनी गटात होणाºया या स्पर्धेत प्रत्येक गटातून अव्वल पाच क्रमांकाना अनुक्रमे ३, २.५, २, १.५ आणि एक हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाने गौरविण्यात येईल. तसेच, किताब विजेत्या खेळाडूला रु. ११ हजार रोख पारितोषिक देण्यात येणारअसल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.
‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा थरार २४ नोव्हेंबरला रंगणार, सुमारे २००हून अधिक खेळाडू सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:05 AM