भिवानी : अनेक राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्चस्व गाजवलेल्या हरियाणाच्या दिनेश कुमारला आपल्या घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे रस्त्यावर कुल्फी विकावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर दिनेशची बॉक्सिंग कारकिर्द संपुष्टात आली. यानंतर उपचारासाठी आणि खेळासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तो आपल्या वडिलांसह कुल्फी विकतोय.दिनेशने बॉक्सिंग कारकिर्दीत राष्ट्रीय स्तरावर १७ सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि ५ कांस्य पदकं अशी २३ पदकांची कमाई केली आहे. वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फिटावं आणि आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून दिनेश कुल्फी विकत आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात दिनेश जायबंदी झाला. यामुळे त्याचे बॉक्सिंग करिअरच संपुष्टात आलं. दिनेशवर उपचार करण्यासाठी त्याच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले. या कर्जाआधी वडिलांनी दिनेशच्या बॉक्सिंग सरावासाठीही कर्ज काढले होते. दिनेशच्या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर कर्जाचे ओझे वाढले. दिनेशने सरकारकडे मदतीची मागणी, सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्जही केले. मात्र, कोणतीही मदत न मिळाल्याने दिनेश कुमारला त्याच्या वडिलांसोबत कुल्फी विकावी लागते आहे.
एकसारख्या नावामुळे झाला गोंधळ..रस्त्यावर कुल्फी विकण्याची वेळ आलेला बॉक्सर आणि आशियाई स्पर्धेत भारतासाठी रौप्य पटकावणारा बॉक्सर या दोघांची नावे एकसारखी असल्याने रविवारपासून विविध प्रसारमाध्यमांमध्ये गोंधळ उडालेला दिसून आला. अनेक वृत्तांमध्ये देण्यात आले की, आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केलेला, आशियाई स्पर्धेतील पदक विजेता आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त बॉक्सर दिनेश कुमारवर कुल्फी विकण्याची वेळ आली. मात्र ज्या दिनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली, तो हरियाणा पोलीसमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असून रस्त्यावर कुल्फी विकणारा बॉस्कर दिनेश हा राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे.
पाहा व्हिडीओ