शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

टिंटू लुका रियो आॅलिम्पिकसाठी पात्र

By admin | Published: August 27, 2015 4:02 AM

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाचे आव्हान पहिल्या हिट

बीजिंग : जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाचे आव्हान पहिल्या हिट पात्रताफेरीतच संपुष्टात आले. उपांत्यफेरीसाठी आपली जागा निश्चित न करू शकलेल्या लुकाने यंदाच्या सत्रातील आपली सर्वश्रेष्ठ वेळेची नोंद करताना आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले.८०० मीटरच्या पहिल्या फेरीतील हिटमध्ये लुकाने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २ मिनिटे ००.९५ सेकंदांची वेळ देत शर्यत पूर्ण केली. मात्र, तिला या वेळी सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रत्येक हिटमधील अव्वल तीन क्रमांकाच्या धावपटू आणि सर्वश्रेष्ठ वेळ नोंदवणारे पुढील सहा धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. लुकाने २०१०मध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना १ मिनिटे ५९.१७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. रियो आॅलिम्पिकसाठी आवश्यक असलेली २ मिनिटे ०१:०० सेकंदाची वेळ लुकाने पार करून आॅलिम्पिक तिकीट मिळवले आहे.विशेष म्हणजे या शर्यतीच्या पहिल्या लॅपमध्ये लुका ५७.०६ सेकंदासह आठ धावपटूंमध्ये पहिल्या स्थानी होती. मात्र यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तसेच अखेरच्या २०० मीटरमध्ये ती खूप मागे पडली. यापूर्वी लुकाने २०११ साली दक्षिण कोरियातील दाएगू येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. दरम्यान, या फेरीमध्ये युरोपीय चॅम्पियन बेलारूसच्या मरिना अरजामासोवाने बाजी मारली. तर ग्रेट ब्रिटनच्या लिंसे शार्प आणि २००९ ची विजेती दक्षिण आफ्रिकेच्या कास्टर सेमेन्या यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था) २०० मीटरमध्ये जंगी मुकाबला..या स्पर्धेत सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीच्या अंतिम शर्यतीकडे. जमैकाचा सुपरफास्ट उसेन बोल्ट आणि त्याला नेहमीच कडवी झुंज देणारा अमेरिकेचा जस्टीन गॅटलिन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्याने क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याआधी झालेल्या १०० मीटर शर्यतीमध्ये काही शतांशच्या फरकाने बोल्टने बाजी मारत गॅटलिनला नमवले होते. त्यामुळे आता तीच थरारक शर्यत पुन्हा एकदा २०० मीटरमध्ये पाहण्यास मिळेल. उपांत्य फेरीतील शर्यतीमध्ये गॅटलिनने बोल्टपेक्षा चांगली वेळ देत १९.८७ सेकंदाच्या वेळेसह अंतिम फेरी गाठली. तर बोल्टने अंतिम फेरीत प्रवेश करताना १९.९५ सेकंदाची वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत कायमच वरचढ ठरणारा बोल्ट काय करु शकतो याची कल्पना असल्याने गॅटलिन त्याच्या विरुध्द गाफिल राहण्याची चूक कदापी करणार नाही.झुंजार मोहंमद फराहने गाठली अंतिम फेरी ब्रिटनचा विक्रमवीर धावपटू मोहंमद फराह याने बुधवारी ५,००० मीटर शर्यतीत अडखळल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्रॅकवळ पडल्यानंतरही फराहने हार न मानता झुंजार कामगिरी केली.१० हजार मीटर शर्यतीत बाजी मारल्यानंतर ५ हजार मीटर शर्यतीचे विजेतेपद पटकावण्याचा निर्धार केलेल्या फराहने चांगली सुरुवात केली. मात्र, अखेरच्या लॅपमध्ये फराह अडखळला आणि त्याचा वेग कमी झाला. परंतु तरीदेखील त्याने स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. या वेळी इथिओपियाचा १८ वर्षीय ज्युनियर चॅम्पियन योमिफ केजल्वाने १३ मिनिटे १९.३८ सेकंदांची वेळ देऊन बाजी मारली. तर, अखेरच्या फेरीमध्ये अडखळल्यानंतरही फराहने द्वितीय स्थान पटकावले. गत दोन जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत ५,००० मीटर शर्यतीत बाजी मारल्यानंतर फराहला विक्रमी हॅट्ट्रिक कामगिरी खुणावत आहे. जर का यामध्ये फराह यशस्वी ठरला, तर जागतिक स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणार तो पहिला धावपटू ठरेल.