शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या लढतीची उत्सुकता शिगेला; महाराष्ट्र केसरीसाठी अभिजित कटके व किरण भगत यांच्यात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:11 AM

एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या सिंहाइतकाच अतुलनीय होती.

- दिनेश गुंडएकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या सिंहाइतकाच अतुलनीय होती. तानाजी झुंजुरकेचा झालेला पराभवसुद्धा इतका कौतुकास्पद होता की उपस्थित प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात तानाजीचे केलेले चिवट झुंजीचे अभिनंदन त्याची साक्ष देऊन गेले. गादी विभागात अंतिम फेरीच्या लढतीत अभिजित कटकेने सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा त्याच्या एकतर्फी विजयाचा शिल्पकार ठरला. आपल्या उंचीचा आणि भक्कम ताकदीचा उपयोग करत अभिजितने एकेरी पट, भारंदाज हप्ते डाव करत १० गुण मिळवून तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळवित सलग दुसºया वर्षी महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली.दुसºया बाजूने साताºयाच्या किरण भगतने प्रेक्षणीय लढती करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. माती विभागात अंतिम फेरीत बलाढ्य ताकदीचा बाला रफीक शेख याच्याबरोबर दिलेली चिवट झुंज त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ देऊन गेली. आपल्या झुंजार खेळाच्या प्रदर्शनाने किरण भगतने अनपेक्षित अशी आक्रमणे करत बाला रफीकला हतबल केले आणि डोळ््याच्या पापण्या मिटण्याइतक्या अवधीत एकेरी कस काढून चितपट करीत माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीसही आपले आव्हान उभे केले. भूगाव मुक्कामी उद्या साताºयाचा एक चपळ चित्ता, तर दुसºया बाजूने पुणे शहराचा ढाण्या वाघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. ४२ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आणि पुण्यामध्ये अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा किरण भगत आपल्या भात्यामध्ये अनेक घातकी डाव ठेवून गदेला हात घालण्यासाठी सरसावून आहे. दुसºया बाजूने उपमहाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताबाला दिलेली झुंज आणि मागील महिन्यात जमखंडीला मिळविलेला भारत केसरीचा मानकरी अभिजित कटके हा आक्रमक पवित्रा घेऊन गतवर्षी हुलकावणी दिलेला महाराष्ट्र केसरी किताबाला आपल्या भक्कम खांद्यावर विराजमान करण्यासाठी तयार आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात उद्याच्या या लढतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, यात शंकाच नाही.

टॅग्स :Sportsक्रीडा