आशियाडमध्ये आज भारत
नेमबाजी : सकाळी ६.३० वा. पुरुष १० मी. एअर रायफलपुरुष २५ मी. रॅपिड फायर पिस्टल९ वा. : पुरुष १० मी. एअर रायफल११.३० वा. : पुरुष २५ मी रॅपिड फायर पिस्टलक्रिकेट : ११.३० वा. भारत-श्रीलंका अंतिम सामनाहँडबाॅल : ११.३० वा. महिला भारत वि. जपानबुद्धिबळ : १२.३० वा. महिला वैयक्तिकजलतरण : ८.०६ वा. महिला गट : ८.३० वा : पुरुष गटनौकानयन : सकाळी ७.०० वा .ज्युदो : ७.३० ते १०.३० : महिला गटरग्बी : ८.२० वा. महिला : भारत वि. सिंगापूरबास्केटबाॅल : ११.२० वा. महिला : भारत वि. उझबेकिस्तानटेबल टेनिस : ४.०० वा. पुरुष : भारत वि. जपानबाॅक्सिंग : ४.४५ वा. महिला गटवुशू : ५.०० वा. महिला गट
भारतीय महिला अंतिम फेरीत
पूजा वस्त्राकार हिच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी बांगलादेशला आठ गडी राखून पराभूत करताना पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. वेगवान गोलंदाज पूजाने चार षटकांत १७ धावा देत चार गडी बाद केले. बांगलादेशचा संघ १७.५ षटकांत ५१ धावांत बाद झाला. भारताविरुद्ध बांगलादेशची ही निचांकी धावसंख्या आहे. भारताने ८.२ षटकांत २ बाद ५२ धावा करताना विजय मिळवला. सोमवारी भारत-श्रीलंका यांच्या अंतिम लढत होणार आहे. श्रीलंकेने दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होईल अशी सर्वांनाचा आशा होती. मात्र, पाकिस्तानच्या पराभवामुळे ड्रीम फायनलचे स्वप्न भंगले.
फुटबाॅलमध्ये भारत-म्यानमार लढत बरोबरीतपुरुषांच्या फुटबाॅलमध्ये रविवारी भारताला म्यानमारविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. जादुई आघाडीवीर सुनील छेत्री याने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने राऊंड १६मध्ये प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना सौदी अरेबियाशी होणार आहे.
महिला फुटबाॅल संघ पराभूतभारतीय महिला फुटबाॅल संघाला थायलंडविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले. थायलंडच्या थोंग्रोंग परिचाट हिने ५२व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० असे आघाडीवर नेले. आघाडी कायम राखत थायलंडने विजय मिळवला.
नागल, मायनेनी-रामनाथन जोडी उपउपांत्यपूर्व फेरीतभारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलने मकाऊच्या हो टिन मार्को लेउंग याच्यावर विजय मिळवत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुमितने ६-०, ६-० अशी एकतर्फी बाजी मारली. पुरुष दुहेरीत साकेत मायनेनी-रामकुमार रामनाथन जोडीने नेपाळच्या अभिषेक बस्तोला आणि प्रदीप खडका जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.
तलवारबाजीत हुलकावणीभारताची तलवारबाज तनीक्षा खत्री हिला वैयक्तिक एपी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या वाई विवियन हिच्याकडून ७-१५ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला पदकाने हुलकावणी दिली. तनीक्षने साखळी फेरीत तीन सामने जिंकून बाद फेरी गाठली होती.
पुरुष व्हाॅलीबाॅल संघ पराभूतभारतीय पुरुष व्हाॅलीबाॅल संघाला रविवारी जपानकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
निकहत झरीनची विजयी सलामीभारताची जगज्जेती मुष्टियोद्धा निकहत झरीनने रविवारी महिलांच्या ५० किलो गटात व्हिएतनामच्या थी ताम एनगुएन हिच्यावर ५-० अशी मात करताना आशियाई स्पर्धेत विजयी सलामी दिली. या विजयासह तिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर प्रीति पवारने (५४ किलो) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रीतिने जाॅर्डनच्या सिलिना अलहासनात हिला पराभूत केले. निकहत म्हणाली की, ही लढत एकतर्फी होईल अशी अपेक्षा नव्हती. पण माझे एकतर्फी विजय मिळवण्याचेच ध्येय होते. पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्याकडे माझे लक्ष आहे. त्यानंतर मी अंतिम लढत आणि सुवर्णपदकाचा विचार करेन.