Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. भारतीय हॉकीचा हा सुवर्णकाळ पुन्हा पाहायला मिळाल्याबद्दल लोकं ओदिशा सरकारचे आभार मानत आहेत.
ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला आणि ज्युनियर, सीनियर, पुरुष व महिला राष्ट्रीय संघासाठी १५० कोटींचा करार केला. २०२३पर्यंत हा करार आहे आणि याशिवाय ओदिशा सरकार वर्ल्ड क्लास ट्रेनिंग, रिहॅब फॅसिलिटी, प्रॅक्टिस पिचच्या माध्यमातून भारतीय हॉकीला संजिवनी दिली आहे. त्यामुळेच हॉकी इंडियासोबत ओदिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले जात आहे.
ओदिशाचे मुख्यमंज्ञी नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.
सहारा इंडिया परिवारानं केलं हॉकी संघाचे अभिनंदनभारतीय हॉकी संघाला २२ वर्ष प्रायोजकत्व देणाऱ्या सहारा इंडिया परिवारानंही आजच्या यशानंतर खेळाडूंचे अभिनंदन केले. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.