शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Tokyo Olympic, Deepak Punia : दीपक पुनियानं 'सुवर्ण'संधी गमावली, अमेरिकेच्या खेळाडूनं काही मिनिटांतच बाजी मारली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 3:30 PM

Tokyo Olympic 2020, Deepak Punia : रवी कुमार दहियानंतर भारताच्या दीपक पुनियाकडून अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षा होत्या,

Tokyo Olympic 2020, Deepak Punia : रवी कुमार दहियानंतर भारताच्या दीपक पुनियाकडून अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर यानं पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करताना ९-० अशी भक्कम आघाडी घेतली आणि त्यानं १०-० असा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ( Deepak Punia bows out against USA's Taylor III ) 

 पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.

रवी कुमारची मुसंडी...कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीचा सामना भारताचा रवी कुमार दहिया आणि कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळवण्यात आला. ( Ravi Dahiya play the semifinal match against KAZ SANAYEV Nurislam) रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे. ( Silver medal assured! Ravi Dahiya first Indian since Sushil in 2012 to enter the wrestling finals in Olympics)  रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्ती